
शासकीय खतांचा काळेबाजाराचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
शासनाद्वारे शेतक-याना सबसीडीवर मिळणा-या रासायनिक खताचा काळाबाजार करणा-या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट १ ने केला पर्दाफाश….


अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहर हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे उद्देशाने तसेच पोलीस आयुक्तालया चे हददीमध्ये रेकॉर्डवरिल गुन्हेगाराबाबत मोहीम राबवीत असताना गुन्हे शाखा युनिट ०१ चे पथकास दिनांक ११/१०/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हददीमध्ये वडगाव माहुरे शेत शिवारा मध्ये बत्रा यांचे प्लॉटचे आवारात रात्रीच्या वेळी निर्जरस्थळी लोकाचे नजरेस पडणार नाही याची दक्षता घेवून काही इसम एक १६ चक्का ट्रकमधून कसलेतरी पोते खाली उतरवून दूसया पोत्यात भरत आहे सदरचे कृत्य हे काहीतरी संशयास्पद आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने व सदर माहीती खात्रीशीर असल्याने युनीट ०१ चे अधिकारी व अंमलदार सदर घटनास्थळावर जावून पाहणी केली असता तिथे तीन इसम हे ट्रक कं. एम एच २७ बि क्यु ९७८६ च्या बाजूला उभे असून काही मजूर हे ट्रक मधून पिवळया कलरच्या खताचे पोते ज्यावर भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरीया असे लिहलेले पोते उतरवून पांढ-या कलरच्या पोत्यात ज्यावर TECHINCAL GRADE UREA FOR INDUSTRIAL USE ONLY असे लिहलेल्या पोत्यात त्यावे वजन काटयावर वजन करून त्याला मशीनद्वारे रिसिलींग करताना दिसून आले.

तेथे उपस्थित असलेल्या इसमाना तेथे चालू असलेल्या कामाबाबत व खताचे बिलाबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे बिल त्याचे कडे नसल्याचे सांगीतले तसेच उडावा उडवीचे उत्तरे देत होते. सदर घटना हि कृषी विभागाशी संबधीत असल्याने कृषी विभागाचे अधिकारी याना घटनेबाबत फोनद्वारे सपंर्क करून माहीती दिली असता सदर विभागाचे अधिकारी हे स्टाफसह सदर घटनास्थळी हजर आले.

https://www.instagram.com/reel/DBB2p9Th8KK/?igsh=aW9rZHE2a25hb2xu
गुन्हे शाखेचे पोलीस पथक तसेच कृषी विभागाचे अधिकारी, पंच व स्टाफ यानी सदर घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम एच २७ बि क्यु ९७८६ असलेला ट्रक उभा मिळून आला त्यामध्ये खताचे १८९ पोते दिसुन आले तसेच खाली जमीनीवर ताडपत्रीवर ४३८ बॅग दिसून आल्या. सदर पांढ-या रंगाचे खताचे पोते ज्यावर ज्म्भ्प्छबर ळतक्म्म न्त्म यत् प्छक्नैपर नैम छरल असे लिहलेले होते व पिवळया रंगाचे खताचे पोते ज्यावर भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरीया असे लिहलेले खतांचे पोत्यांची उघडुन पाहणी केली असता त्यामध्ये युरीया खत असल्याचे दिसुन आले.
त्यामुळे उपस्थित असलेल्या तिन इसमाना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी त्यांचे नावे अनुक्रमे १) संजय रमेशचंद्र अग्रवाल, वय ५४ वर्ष रा. पद्मावती चौक, पुलगाव रोड, आर्वी जिल्हा वर्धा २) अशोक धनराज रावलानी, वय ५४ वर्ष रा. कृष्णा नगर, अमरावती ३). ट्रक चालक दिनेशकुमार छबराज यादव, वय ४५ वर्ष, रा. रमबीयाल गंज, ता. मनीयाहू जि. जौनपूर, उत्तरप्रदेश असे सांगीतले व त्यांना सदर खताबाबत परवाना व खरेदी पावती आहे अगर कसे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणताही परवाना व खरेदी पावती नसल्याचे सांगीतल्याने घटनास्थळावरून आरोपीचे ताब्यातुन १) पिवळया रंगाचे १८९ बॅग प्रती बॅग ४५ किलो वजन असलेले किं. ४,२५,६२८/- रू २) पांढ-या रंगाचे ४३८ बॅग प्रती बॅग ५० किलो वजनाचे किं १०,९५,९७३/-रु ३) एक टाटा कंपनीचा ट्रक क. एम/एच/२७बि/क्यु/९७८६ अं कि. १५,००,०००/- रू ४) पोत्यांची शिलाई करणे करिता वापरण्यात येणारी ईलेक्ट्रीक शिलाई मशीन कि १५,०००/- ५) ईलेक्ट्रीक वजन काटा कि १००००/- असा एकून ३०,४६,६०१/- रु चा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
वर नमूद आरोपी हे स्वताचे आर्थीक फायदया करिता शासनाने शेतक-याना दिलेल्या अनुदानाच्या खताचा काळा बाजार करताना मिळून आल्याने कृषी अधिकारी प्रविण विजय खर्चे, वय ४५ वर्ष, खत निरीक्षक तथा मोहिम अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे तकारीवरून पोलिस स्टेशन नांदगाव पेठ येथे गुन्हा नोद करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलिस स्टेशन नादंगाव पेठ करित आहे
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी, पोलिस उपायुक्त(मुख्यालय) कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त (परीमंडळ १) सागर पाटील. सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे सहायक पोलिस आयुक्त(फ्रेजरपूरा विभाग)कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट. ०१ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि योगेश इंगळे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा फिरोज खॉन, सतिष देशमुख, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझिउददीन सैयद, विकास गुडदे,पोशि सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहर, चालक रोशन माहुरे, किशांर खेंगरे यांनी केली
तसेच याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी राहूल सातपूते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अमरावती, अजय पंजाबराव तळेगावकर जिल्हा कृषि अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती, प्रविण विजय खर्चे, वय ४५ वर्ष, खत निरीक्षक तथा मोहिम अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, उध्दव संतराम भायेकर, कृषि अधिकारी पंचायत समिती अमरावती, व स्टाफ यानी केलेली आहे.


