अवैधरित्या गुटखा,सुगंधीत तंबाखुची विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अवैध्य गुटखा विक्री करणा-यावर अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट – २ ची धडक कारवाई…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त यांचे आदेशान्वये आयुक्तालय हद्दीतील अवैध्य गुटखा विक्री करणारे  व बाळगणा-या इसमांवर कार्यवाही करावी असे आदेश गुन्हेशाखा, अमरावती शहर यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचे आदेशाने युनिट क्र. २ येथील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमुन अवैध्य गुटखा बाळगणु विक्री करणारे व बाळगणारे यांचेवर कार्यवाहीचा बडगा उभारतांना दिसतोय





त्यानुसार दि.(११) रोजी गुन्हेशाखा युनिट २ चे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती मिळाली की, भाजी बाजार येथे साई पान मटेरीयल नावाचे दुकानामध्ये एक इसम हा राज्यात गुटखा बंदी असतांना सुध्दा तो शहरात गुटखा विक्री करीत आहे. सदर माहीती वरीष्ठांना देवुन व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना माहीती देवुन त्यांचेसह सदर इसमावर भाजी बाजार येथील साई पान मटेरीयल नावाचे दुकानामध्ये जावुन पाहणी केली असता एक इसम हा वेगवेगळया कंपनीचे गुटखा विक्री करीत असतांना मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जोतिश उर्फ जॉनी बुधरमल मंगवानी वय ४२ वर्ष रा. रामपुरी कॅम्प अमरावती असे सांगितले. त्याचे पान ठेल्यातुन वेगवेगळया कंपनीचे १) २३ पॅकेटस बाजीरा गोल्ड पान मसाला एकुण कि. अं २७६०/-रू, २) १६ पॅकेटस पान पराग पान मसाला एकुण कि ४०००/- रू, ३) १३ पॅकेटस पान बहार एकुण कि.अं २९२५/-रू, ४) ९ पॅकेटस पान पराग प्रिमीयम एकुण कि.१८००/-रू, ५) २१ पॅकेटस गुटखा नजर ९००० एकुण कि.२७३०/-रू, ६) २० सुंगधी तंबाखु मस्तानी गोल्ड एकुण कि.६००/-रू, ७) ०६ पॅकेट६६स पानमसाला नागपुरी एकुण कि.७२०/- रू असा एकुण १५,५३५/- रू चा मुद्देमाल जप्त करून नमुद आरोपीविरूध्द पो.स्टे. खोलापुरी गेट येथे कलम २२३, २७४, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आला आहे.



सदरची कारवाई  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी  यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त  सागर पाटील, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे, पोनि गोरखनाथ जाधव , गुन्हे शाखा अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, आणि अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती येथील अधिकारी श्री. गजानन गोरे  व पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, नईम बेग, निलेश वंजारी, सागर ठाकरे राजीक रायलीवाले, संदीप खंडारे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!