अमरावती पोलिस आयुक्तांच्या CIU पथकाने टाकला क्रिकेट बुकीवर छापा,मुद्देमालासह आरोपी अटकेत…
अमरावती– सवीस्तर व्रुत्त असे की दि. 29/10/2023 रोजी पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी.
वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या सट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्तांच्या सि आय यु या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, महेश नगर येथे
जितेश रमनीकलाल आडतीया वय 50 वर्ष रा.महेश नगर,अमरावती
हा त्याच्या घरुन इंडीया विरुद्ध इंग्लंड या आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनचे सहाय्याने तसेच लिंकच्या सहाय्याने बेटींग घेवून सट्टा जुगाराचा खेळ पैश्याची बाजी लावुन खेळवित आहे. या प्राप्त माहीती वरुन सदर ठिकाणी जावुन रेड
केली असता नमुद आरोपी जितेश रमनीकलाल आडतीया वय 50 वर्ष रा. महेश नगर अमरावती हा इंडीया विरुद्ध इंग्लंड या आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोबाईल मधील गुगल क्रोम मध्ये OSTIN 777 या नावाचे ऑनलाईन बेटींग अॅप या नावाचे गैरकायदेशीर सॉफ्टवेअर बनवुन लोकांना खरे आहे असे भासवुन त्या मध्ये चालु असलेल्या क्रिकेट मँचचे भावावर फोनचे तसेच लॅपटॉपचे सहाय्याने बेटींग व हीशोब करतांना मिळुन
आला तसेच त्याच्या जवळ असलेल्या इतर मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॅाल वरुन क्रिकेट सामन्यावर बेटींग घेवुन सट्टा जुगार खेळ खेळविल्याच्या रेकॉर्डींग दिसुन आल्या. त्याचे वरुन त्यांना सदर अॅप बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा व्यवहार विशाल थुनेजा
नामक व्यक्तीला देत असल्याचे सांगीतले. यावरुन तो त्यांना बेटींग सट्टा खेळवित असुन त्या दोघांची सदर व्यवहारामध्ये काही प्रमाणात भागीदारी असल्याचे सांगीतले.
प्रथमदर्शनी नमुद सट्यांच्या हीशोबाची पाहणी केली असता त्याची लाखों रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसुन आले. वरुन ताब्यातील आरोपी नामे जितेश रमनीकलाल आडतीया वय 50 वर्ष रा. महेश नगर अमरावती यांच्याकडुन जप्ती पंचनाम्याप्रमाणे क्रिकेट सट्याचे
जुगार साहीत्य खालील प्रमाणे जप्त करण्यात आले.
1) डेल कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप व चार्जर कि.अ. 40,000/-रु.
2) वन प्लस नॉर्ड 3.5 जी काळ्या रंगाचा मोबाईल कि.अ. 30,000/-रु.
3) रेडमी नोट 6 प्रो कंपनीचा रोज गोल्ड रंगाचा मोबाईल कि.अ. 10,000/-रु.
4) रेडमी 4 ए कंपनीचा गोल्डन रंगाचा मोबाईल कि.अ. 7,000/-रु.
5) लावा कंपनीचा काळया गोल्डन रंगाचा साधा मोबाईल कि.अ. 1500/-रु.
6) लावा कंपनीचा निळ्या सिल्वर रंगाचा साधा मोबाईल कि.अ. 1500/- रु.
7) एक एच.पी. कंपनीचा पेन ड्राईव्ह कि.अ. 300/- रु.
8) दोन मॅचवरील झालेले व्यवहार लिहलेले रजिस्टर तसेच चालु मॅचचा व्यवहार लिहलेले कागद असा एकुन 90,300/- रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे. राजापेठ येथे कलम 420, 465, 468, 471, 34 भा.द.वि. सह कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढे तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त अमरावती शहर,
सागर पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 अमरावती , विक्रम साळी, पोलिस उपायुक्त परिमंडळ २ अमरावती,शिवाजी बचाटे, सहा. पो. आयुक्त, गुन्हे शाखा अमरावती यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु, पो. हे का. सुनिल लासुरकर,
ना.पो. शि. अतुल संभे, पो. शि. राहुल देंगेकर यांनी केली आहे.