
बिझीलॅंड शॅापींग कॅाम्प्लेक्स येथील चोरीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश…
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने बिझीलॅंड येथील दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या…
अमरावती (प्रतिनिधी)- गुन्हे शाखा युनिट क्र.1 अमरावती शहर यांनी 24 तासांच्या आत दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयूर किशोर सोळके (वय 18वर्षे), रोहीत चंदूलाल विश्वकर्मा (वय 21 वर्षे) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार झिनीत हॉस्पीटल जवळ जना कॉटन मार्केट अमरावती यांना अटक करून त्यांच्या कडून 9060-/ रू. रोख रक्कम, दोन अँड्रॉइड कपंनीचे मोबाईल कि.अं 20,000/- रु., एक चायना चाकू अं.कि 500/- रू. आदी जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी – रवी पूरणचंद खेमचंदानी (वय 42 वर्षे) रा.सिधी कॅम्प,अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी रवी खेमचंदानी यांचे बिझीलॅड मध्ये साईक्रिष्ण ॲम्पोरियर्स नावाचे दुकान असून त्यांच्या भावाने नेहमी प्रमाणेच दूकान उघडले असता दूकानाचे शटर वाकलेले दिसले व त्यांच्या दूकानाच्या गल्यातील 7000/- रू दिसून आले नाही तसेच त्यांचे बाजूला असणा-या चार दूकानाचे सुद्धा शर्टर वाकून त्याचे सुध्दा दूकानाचे गल्यातील असे एकूण 63,500/- रू. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दूकानाचे शर्टर वाकून गल्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. असे फिर्यादी यानी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन नादंगावपेठ येथे अप.कं 14/2024 कलम 454,457,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनीट क्र. 1 अमरावती हे करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर सोळंके रा.जूना कॉटन मार्केट, अमरावती व त्याचे इतर साथीदार यानी सदरचा गुन्हा केला असून सध्या ते प्रमात टॉकीज येथे चित्रपट पाहत आहेत युनीट क्र. 01 चे अधिकारी व अंमलदार यानी स्टाफसह सापळा रचून आरोपींनी प्रभात टॉकीज समोरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले.

आरोपी क्र.1 याच्या अंगझडती मध्ये एक मोठा चायना चाकू मिळून आला, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यानी यापूर्वी सुध्दा दिवाळीच्या पूर्वी सिटीलैंड व्यापारी संकूल येथे दहा ते बारा दूकानं फोडले असून त्यांच्या कडून सविस्तर तपास करण्यासाठी आरोपीला अटक केली असून त्याच्या कडून आता शहरातील व इतर भागातील अधिक गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्र. 01 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीश वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खान, सतीश देशमूख, नाईक पोलिस अंमलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर भूषण पदमने, किशार खेंगरे यानी केलेली आहे.


