पोलिस आयुक्तांचे आदेशाने झालेल्या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट २ ने केले चोरीचे दोन गुन्हे उघड…
अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती शहर आयुक्तालय परीसरात सततच्या होणार्या चोरीचे गुन्ह्यसंबंधात
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी गुन्हेशाखा युनिट क्र. २ अमरावती शहर यांना पोलिस आयुक्तालय हद्दीतील चोरींच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच चोरी चे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेशीत केल्यावरून त्या अनुषगांने गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकिस आणले.
१) पो.स्टे. राजापेठ अमरावती शहर येथे दिनांक १९/१०/२०२३ रोजी फिर्यादी नामे सौ. डॉ. रूतीका राहुल लोखंडे य ३५ वर्ष रा. खापर्डे बगीचा, अमरावती यांनी तक्रार दिली की, कवर नगर, महानुभाव आश्रम समोरील हॉस्पीटलचे बांधकामाच्या ठिकाहुन 1 MM, 1.5 MM, 2MM, 4MM, 6MM, 10MM व त्यामध्ये चार MCB असा केबल तोडुन नुकसान केले व त्यापैकी एकुण ७०,०००/- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने दि. १८/१०/२०२३ ते दि. १९/१०/२०२३ चे रात्री दरम्यान चोरून नेला आहे. अशा फिर्यादी चे तक्रारी वरून पो.स्टे. राजापेठ येथे अप. क्र. ९१८/२०२३ कलम ४५७, ३७९, ४२७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवला होता. दिनांक २८/१०/२०२३ रोजी गुप्त माहीती वरून संशईत
१) जहीर खान उर्फ राजा वल्द जमीर खान वय १८ र्ष रा. अकबर नगर, अबुताला मस्जीत जवळ, पो.स्टे. नागपुरी गेट, अमरावती,
२) अब्दुल मोईन वल्द अब्दुल मोहसिन वय २२वर्ष रा. गुलझार नगर, मस्जीद जवळ, पो.स्टे. नागपुरी गेट, अमरावती
यांना ताब्यात घेवुन त्यांना कौशल्यपुर्ण विचारपुस करून चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. राजापेठ हद्दीतील कवर नगर, येथील बांधकामाच्या ठिकाणाहुन दोन्ही आरोपीतांनी ईलेक्ट्रीक वायर चोरी केल्याचे कबुली दिल्यावरून त्याना अटक करून त्यांचे ताब्यातुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून चोरी चा गुन्हा उघडकिस आणला त्यांचे ताब्यातुन
१) )ईलेक्ट्रीक वायर जाळुन काढलेले तांब्याचे तार वजन अंदाजे ३८ किलो कि.अं. २५,०००/-रू
ર)स्प्लेन्डर लाल काळ्या रंगाची क्र. एमएच-२७ डि.जी-६६२१ ज्याचा चेचिस कि. अं. ७५,०००/-रू क्रमांक MBLHAW11795H14893 इंजीन क्रमांक HA11EVN5H59872
१,००,०००/-रु तसेच
२) पो.स्टे. सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दिनांक २२/१०/२०२३ रोजी फिर्यादी अविनाश ठाकुर वय ३० वर्ष रा.
किरण नगर अमरावती यांनी पो.स्टेला येवुन रिपोर्ट दिला की, दि. २१/१०/२३ रोजी राजकमल चौक येथे मो.सा. क्र. एम. एच-२७- बि. ए-१६०८ हि उभी करून अंबादेवी दर्शनाकरीता गेले असता दर्शन करून परत आले असता त्यांनी उभी करून ठेवलेल्या ठिकाणी मो. सा. दिसुन आली नाही. त्यांची हिरो स्प्लेन्डर प्रो क्र. एम. एच-२७- बि.ए- १६०८ कि.अं.२५,०००/- रू ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली अशा फि चे जबानी रिपोर्ट वरून अप.क्र. ४७६ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. चा गुन्हा नोंद केला होता
सदर गुन्हयाचा संमातर तपास करून गुप्त माहीती वरून आरोपी नामे
शेख सलाउद्दीन शेख शिराजउद्दीन वय ३२ वर्ष रा. नुर नगर अमरावती
यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयात चोरी गेलेली हिरो स्प्लेन्डर प्रो क्र. एम. एच-२७ – बि. ए-१६०८ कि.अं.२५,०००/- रू ची जप्त करून सदरचा गुन्हा उघडकिस आणले. गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे दोन गुन्हे उघडकिस आणुन ३ आरोपीतांना अटक करून त्यांचे ताब्यातुन एकुण१,२५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेडी , पोलिस उपायुक्त सागर पाटील, .सहाय्यक पोलिस उपआयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे
नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि राजकिरण येवले, पोलिस अंमलदार राजेंद्र काळे, संजय वानखडे, जावेद अहमद,
दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, योगेश पवार, राजीक रायलीवाले संदीप खंडारे यांचे
पथकाने केली आहे.