
मुळशी पुणे येथुन आलेल्या सराईत २ गुन्हेगांरास अमरावती गुन्हे शाखा युनीट २ ने अटक करुन केले पुणे पोलिसांच्या स्वाधीन…
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ९/११/२३ रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट १ ला पूणे ग्रामीण पोलिसांकडून माहीती मिळाली कि पोलिस स्टेशन पौड अपराध कं 522/2023 कलम 307,364 (अ), 324,504,506,34 भादवी मधील आरोपी नामे संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आलेले आहे. सदर माहीतीवरून युनिट १ चे अधिकारी व स्टाफ हे अमरावती शहरातील हॉटेल / लॉज तसेच आरोपीचे संभाव्य राहण्याच्या ठिकाणाचा शोध घेत असताना दिनांक १२ रोजी रात्री १२.३० वा च्या दरम्यान माहीती मिळाली कि अमरावती येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा सागर खिराडे यांचे सोबत बाहेरील शहरातील तिन इसम आहे व सध्या ते त्याचे फोर व्हिलर गाडी कं. MH27/BV/4823 मध्ये फिरत आहे. सदर माहीतीवरून सागर खिराडे व इतर इसमांचा शोध घेत असता गुन्हे शाखा युनिट कं. १ ला आशियाड कॉलनी चौकात सागर खिराडे हा त्याचे चारचाकी गाडी कं. MH27 / BV / 4823 सह दिसून आल्याने पोलीसांना पाहताच सागर खिराडे हा तेथून अंधाराचा फायदा घेवून ऐका इसमासह पळून गेला व गाडीत मागच्या सिटवर बसलेले दोन इसमाना पोलींसानी ताब्यात घेतले तेव्हा त्यानी त्यांचे नाव व पत्ता
१) विपुल उत्तम माझिरे वय २७ वर्ष रा रावडे ता.मुळशी पो.स्टे पौंड पूणे ग्रामीण


२) प्रदीप उर्फ पंकज धनवे वय २७ वर्ष रा सिहगड रोड दांडेकर
पुल १३० दत्तवाडी पूणे

असे सांगीतले तसेच सांगर खिराडे याचे सोबत पळालेल्या इसमाचे नाव संतोष धुमाळ रा मुळशी पूर्ण असे सांगीतले.
गुन्हे शाखा युनिट १?यानी वर नमूद दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपी हे अमरावती येथे मागील दोन दिवसापासून शेगाव परिसरात राहत होते व तेथे त्याना अमरावती येथील गुन्हेगारी प्रवुतीचा सागर खिराडे यानी आश्रय दिल्याचे सांगीतले आहे. तसेच पळून गेलेला आरोपी संतोष धुमाळ तसेच ताब्यात असलेला आरोपीनामे विपुल माझिरे हे MCOCA केस मधील आरोपी असून दोन ते तिन महीण्यापूर्वीच कारागृहातून सुटल्याचे सांगीतले आहे. तसेच सध्या ते पौड पोलिस स्टेशन मध्ये त्यांचवर दाखल गुन्हातील अटक चूकवण्यासाठी पूणे येथून पळाले आहे. सदर आरोपींना कायदेशिर प्रकीया करून पौड पोलिस
स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
|सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी , पोलिस उपायुक्त सागर पाटील पोलिस उपायुक्त विक्रम साळी ,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, पोलिस नाईक दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, चालक अमोल बाहदरपूरे, भूषण पदमणे, किशांर खेंगरे तसेच पोलिस स्टेशन गाडगेनगर चे पोउपनि माकोळे पोलिस नाईक विनोद मालवे, संतोष चव्हाण, संदिप चव्हाण, नंदू धनवटे, बानूवाकोडे चालक दिनेश टवले, जाकीर भाई यानी केलेली आहे.



