
धक्कादायकःशुल्लक कारणावरुन बापाने पोरास भोसकले,मुलगा गंभीर जखमी
धुलीवंदनाचे दिवशी शेंदोडा येथील खुनाचा प्रयत्ना करणारा जन्मदाता बाप व सराईत आरोपीस नांदगावपेठ पोलिसांनी केले जेरबंद….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,धुलींदनाचे दिवशी दि. २५/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०७/०० वाजेच्या सुमारास शेंदोडा धस्कट येथील वडील व मुलगा यांचेत शुल्लक कारणावरुन वाद झाला वादाचे रुपांतर शिविगाळ व मारामारीत होऊन वडील नामे राजु जलता पवार यांनी त्यांचा मुलगा सर्विस पवार यांस धारदार चाकुने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यास पोटावर वार करुन गंभीर जखमी केले त्यावरुन पोलिस स्टेशन नांदगाव पेठ येथे अप क्र ११० / २०२४ भादवि कलम ३०७, सहकलम १३५ मपोका अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना यांतील आरोपी राजु जलतारी पवार वय ६० वर्षे, रा. शेंदोडा धस्कट, ता. तिवसा जि. अमरावती हा पळुन जाण्याचे बेतात असतांना त्यास शेंदोडा धसकट येथे शोध घेऊन ताब्यात घेतले


आरोपी राजु जलतारी पवार हा रीकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर विविध पोलिस स्टेशन मध्ये मालाविरूदध,शरिराविरुदध व दारूबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. गुन्हयाचे तपासात गुन्हा करतांना वापरलेला चाकु जप्त करण्यात आला आहे. आरोपी राजु पवार याचा २ दिवसाचा पीसीआर मा.न्यायालयाने मंजुर केला असुन तो सध्या पोलिस कोठडीत असुन गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १, सागर पाटील, सहा पोलिस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग,कैलाश पुंडकर, यांचे मार्गदर्शनाखाली नांदगावपेठ
पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड,सहा पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलिस उप निरीक्षक राजेश वाकडे, पोहवा संजय खारोडे, पोशि वैभव सवईकर,निलेश सावीकर,नावेद खान, गजानन तायडे, चालक नापोशि सुहास पंचभये, वैभव धुरंदर यांनी केलेली आहे.



