
अवैधरित्या गांजा बाळगणारे दोघे युनीट १ च्या ताब्यात….
अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे गुन्हे शाखा युनीट १ ने गाडगेनगर हद्दीतुन घेतले ताब्यात,दोन आरोपींसह ९ किलो गांजा केला जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट. ०१ अमरावती शहर चे अधिकारी व अंमलदार हे दि(०३) ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेटोलींग करत असताना गुप्तबातमीदाराकडून माहीती मिळाली कि एक ईसम हा त्याचे साथीदारासह पंचवटी चौक पंजाबराव देशमुख हॉस्पीटल जवळ गाजा बाळगून विक्रीसाठी येत आहे.


सदर माहीती खात्रिशीर असल्याने अंमली पदार्थ पंचवटी चौक येथे नाकाबंदी करुन सापळा रचला असता माहिती प्रमाणे संशईत ईसम व त्याचा साथीदार हा पि.डी.एम. सी हॉस्पीटल कडून पंचवटी चौका कडे येताना दिसला व मिळालेल्या माहीतीप्रमाणे त्यावे वर्णन असल्याने पथकाच्या मदतीने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी त्याचे नाव व पत्ता १) सैयद अजमत सैयद मुकदर वय ५५ वर्ष व्यवसाय मनूरी रा. आझाद नगर गल्ली न. ०१ पो. स्टे गाडगेनगर २) समीर शहा नाजीर शहा वय २७ वर्ष व्यवसाय – मजूरी रा. मुक्ती झिया मदरसाजवळ, लालखडी पो. स्टे नागपूरीगेट अमरावती असे सांगीतले

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यानी शर्टच्या आतमध्ये पोटाला पांढ-या कलरच्या कापडी पटटयात ज्याला पांढ-या दोरीने बाधंलेले त्याला उघडून पाहीले असता आत प्लास्टीक मध्ये गांजा नावाचा अंमलीपदार्थ मिळून आला त्या दोघांकडे एकून ९ किलो ८६५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा ज्याची अंदाजे किमंत १,९७,०००/- रू चा मिळून आला.

यावरुन त्यांचे विरूदध एन.डी.पी.एस अॅक्ट अन्वये पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुददेमाल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन गाडगेनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी, पोलिस उपआयुक्त कल्पना बारवकर,. सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त,(गाडगेनगर विभाग) अरून पाटील यांचे मार्गदर्शना खाली युनिट ०१ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि योगेश इंगळे, पोउपनि प्रकाश झोपाटे, फिरोज खॉन, सतिश देशमूख, अलीमउददीन खतीब नाईक, सुधीर गुडदे पोलीस अमंलदार नाझिमउददीन सैयद, विकास गुडदे, चेतन कराळे पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहर चालक रोशन माहुरे, किशोर खेंगरे तसेच पोलीस स्टेशन सायबरचे सहायक पोलिस निरिक्षक अनिकेत कासार, नाईक पोलीस अमलदार निखील माहूरे यानी केलेली आहे.


