अट्टल वाहन चोरटा गुन्हे शाखा युनिट १ च्या जाळ्यात,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त..
वाहन चोरी करणारा अट्टल चोरटा अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अमरावती(प्रतिनिधी) – अमरावती मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल वाहन चोरास पकडण्यात अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट कं.01 अमरावती शहर यांनी आरोपीला ताब्यात घेऊन दोन चारचाकी , टवेरा गाडी, एक होंडा सिटी व एक टू व्हिलर होंडा शाईन आदी गाड्यांचे गुन्हे उघड केले आहेत. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे कि, फिर्यादी माजीद अमीन वल्द अमीन उल्ला खान वय – 41 रा.पॅराडाईज कॉलनी अमरावती यांनी त्यांची दुचाकी होंडा डियो कंपनीची क्र.एम.एच. 49/एझेड/9210 कि. वर नमूद तारखे वेळी उभी करून शाळेत गेले होते व परत आले त्यावेळी त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची मोटर सायकल मिळून आली नाही तेव्हा कोणी तरी अज्ञात इसमाने गाडी चोरून नेली अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्र.01 अमरावती हे करत असताना गुप्त बातमीदाकडून मिळालेल्या माहीती वरून आरोपी मोहमद मुदस्सीर मोहमद युनूस (वय 22वर्षे), व्यवसाय – मजूरी का.रा.ठि. गौजीया मजिद जवळ, न्यु तारफैल पो.स्टे रामदास पेठ अकोला ह.मु पॅराडाईज कॉलनी अमरावती याला ताब्यात घेऊन वर नमूद प्रमाणे गुन्हे उघड झाले असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीकडून व इतर संबंधीतांकडून मिळालेल्या काही गाडयांबाबत गुन्हे नोंद असून काही गाडीबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपीकडून अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
याच्या विरूध्द फियांनी दिलेल्या फिर्यादीवरून या मध्ये चोरी गेलेला माल – दुचाकी मोटर साईकल होडा डियो कंपनीची कं. एम.एच. 49/एझेड/9210 कि.अंदाजे 35000 रू. असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेला मुद्देमाल –
1) होंडा शाईन MH/30/AY/4832 अंदाजे किमंत 80,000रु
2) एक पांढ-या कलरची फोर व्हिलर टवेरा गाडी कं. MP/09/BD/5880 अंदाजे किमंत 4,50,000 रु
3) एक पांढ-या कलरची फोर व्हिलर होडा सिटी कं. GJ/06/CM/6576 अंदाजे किमंत 5,50,000 रु
4) एक पांढ-या कलरची फोर व्हिलर टवेरा गाडी कं. MH/18/W/5434 अंदाजे किमंत 4,50,000 रू
असा एकूण 15,30,000 रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान उघडकीस आलेले गुन्हे –
1) पोलिस स्टेशन पिजर जि अकोला अपराध कं. 307/2023 कलम 379 भादवी, होंडा शाईन MH/30/AY/4832
2) पोलिस स्टेशन जिल्हापेठ जि जळगाव अपराध कं. 426/2023 कलम 379 भादवी, फोर व्हिलर टवेरा गाडी क्र. MP/09/BD/5880
3) पोलिस स्टेशन सरथाना जि सुरत शहर राज्य गुजरात अपराध कं. 1121008232084/2023 कलम 379 भादवी, फोर व्हिलर होडा सिटी क्र. GJ/06/CM/6576
4) पोलिस स्टेशन धुळे शहर जि धूळे अपराध कं . 469/2023 कलम 379 भादवी, फोर व्हिलर टवेरा गाडी क्र. MH/18/W/5434
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त, सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क.01 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खान, सतीष देशमूख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, चालक अमोल बाहदरपूरे., माहूरे किशार खेंगरे यांनी केलेली आहे.