खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आरोपीस मुद्देमालासह अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

खोलापुरी गेट(अमरावती शहर पोलिस) –   सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  खोलापुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, खोलापुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे.-७१६५ कि.अं. ३०,०००/- रू  कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे  तक्रारीवरुन  अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१/ २०२३ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी  यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हद्दीत मोटार सायकल च्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच सदर मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील पथकाने पाळत ठेवुन पेट्रोलिंग करीत असतांना. दिनांक ०७/०९/२०२३ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की एक इसम हा चोरीची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे. ७१६५ गाडी ही लालखडी परीसरात घेवुन फिरत आहे अशा माहीती वरून सदर
इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सैय्यद राशिद सैय्यद नुर रा. पठाण
चौक, अमरावती असे सांगितले. त्याचे ताब्यातील मोटारसायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७.डि.जे. – ७१६५ वाहनाचे
कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडविचे उत्तरे दिल्या वरून सदर वाहनाचे पो.स्टे. खोलापुरी गेट येथे विचारपुस केली असता सदर मोटारसायकल ही चोरी झाल्याबाबत निष्पन्न झाल्या वरून सदर इसमास विश्वासात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्यांने सांगितले की, सदर मोटार सायकल आणि इतर ५ मोटार सायकली सुध्दा मी चोरी केली आहे. वरून सदर आरोपीस पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि. गुन्हयात अटक करून त्याचे ताब्यातुन खालील प्रमाणे चोरीच्या एकुण ६ मोटार सायकली जप्त केल्या आहे.
१) खोलापुरी गेट अप. क्र. २२१/ २०२३ कलम ३७९ भा.द.वि
हिरो स्प्लेन्डर कंपनीची मो.सा. MH-27DJ7165 किंमत ३०,०००रु
२)खोलापुरी गेट अम. श. अप. क्र.१६३/२०२३ कलम ३७९ भादवि
बजाज पल्सर कंपनीची काळया रंगाची मो. सा. MH-27AU-७११६ किमत ३००००/₹
३)चांदुर बाजार अम. ग्रा. अप. क्र. ३९६/२०२०  कलम ३७९ भादवि शाईन होन्डा कंपनीची एम. एच-२७- डि.वाय. ३४१६ किंमत ५०,०००/- रू

स्प्लेन्डर कंपनीची मो.सा MH27F0306 किंमत  ३०,०००/-रु





स्प्लेंडर   MH27AJ1987 किंमत ३०,०००/-रू



आर. एक्स कंपनीची मो.सायकल MH27J8626 किंमत ३५०००/-₹
पोलिस आयुक्तलाय अमरावती शहर येथील ५ गुन्हे व अमरावती ग्रामीण येथील १ गुन्हा असे एकुण ६ मोटार सायकल चे गुन्हे कि.अं. २,२५,०००/- रू चा मुद्देमाल आरोपी नामे सैय्यद राशिद सैय्यद नुर रा.पठाण चौक, अमरावती याचे ताब्यातुन जप्त करून गुन्हे उघड करण्यात आले.
सदर ची कारवाई  पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी ,पोलिस उपायुक्त परीमंडळ – १  सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे , प्रशांत राजे  यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.राहुल  आठवले, गुन्हे शाखा
युनिट क्र. २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि राजकिरण येवले, पोलीस अंमलदार:- राजेंद
काळे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन देवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार तसेच चालक संदिप खंडारे यांनी केली आहे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!