अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

अमरावती – पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे अशी माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.





अकरम खान उर्फ गुड्डू वल्द बादुल्ला खान (वय १९) रा. अलीमनगर, फरदीन खान युसूफ खान (वय २१) रा. राहुलनगर, मुजम्मील खान जफर खान (वय २१) रा. गुलीस्तानगर, शेख सुफीयान मोहम्मद अशफाक (वय १९) रा. यास्मीननगर, अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय १९) रा. गुलीस्तानगर व जाहेद शहा हमीद शहा (वय २०) रा. लालखडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.



या बद्दल अधिक माहिती अशी की, शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीमधील सदस्य स्वत:जवळ चाकू बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या आधारावर गुन्हे शाखेने सापळा रचून अब्दुल सोहेल याला अटक केली. त्याच्याकडून १ खंजीर व २ चायना चाकू जप्त केले. चौकशीत त्याने टोळी प्रमुखासह इतरांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डू, फरदीन खान, मुजम्मील खान, शेख सुफियान व जाहेद शहा यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.



चौकशीत आरोपी मुंबईवरून शस्त्रांची मागणी करून त्याची शहरातील गुन्हेगारांना विक्री करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपींकडून दोन देशी कट्ट्यांसह १०२ खंजीर, चायना चाकू असा १ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मध्ये आरोपींकडून शहरातील शस्त्र बाळगणाऱ्या अनेक गुन्हेगारांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी शस्त्रे जप्त होण्याची शक्यता आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!