
घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद
घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद
अमरावती – घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,त्याअनुषंगाने पोस्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे दि.२२नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.२२नोव्हेंबर ला ००:१५ वा.सू. त्यांचे मालकीचे जश्ने बार, मनोहर मांगल्य मंगल कार्यालय समोरील जुना बायपास रोड अमरावती येथील बार बंद करून घरी गेले व सकाळी ११:१५ वा.सू. बार मध्ये येवुन पाहीले असता बार चे मागील दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन कोणी तरी अज्ञात चोराने रात्री दरम्यान बार मधुन गल्यातील नगदी ३,०००/- रूपये व वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारू च्या पावटया असा एकुण १८,२००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशा जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. राजापेठ येथे अप.क. ९८६/२०२३ कलम ४५७, ३८० भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.


पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हेशाखा युनिट २ यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट कमांक २ यांच्या पथकाने गुप्त बातमीदार नेमुण त्यांना गुन्हया बाबत माहीती काढण्याबाबत सुचना देवुन पळत ठेवली.

नमुद गुन्हयाचा तपास करीत असतांना दि.०२ डिसेंबर रोजी गुप्त बातमीदाराच्या माहीतीचे आधारे गुन्हयात संशयीत आरोपी १) सुरेश उर्फ जादु, शेंडयापिश्या नरेंद्र मंलाहे (वय २० वर्ष), रा. आठवडी बाजार, यवतमाळ जि.यवतमाळ, २) शकंर रामराव घुडसे (वय ३५ वर्ष), रा.ग्राम चिखली ता.आर्णी, नि.यवतमाळ यांना यवतमाळ येथुन ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत बारकाईने व कसून विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली. तसेच इतर गुन्हयाबाबत सुध्दा कबुली दिली. त्यांचे ताब्यातुन सदर गुन्हयाती व इतर गुन्हयातील ६२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परीमंडळ-१ सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क.२ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि राजकीरण येवले, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, संजय वानखडे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी तसेच चालक संदिप खंडारे यांनी केली आहे.


