सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात मोटर सायकल चोरीला आळा बसावा याकरीता जिल्हयातील मोटर सायकल चोरटयांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर मोटारसायकल चोरीचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, एक विधिसंघर्षित बालक याने पो.स्टे. वरुड येथील यावलकर सभागृहासमोरुन स्प्लेन्डर मोटर सायकल चोरुन नेवून ती त्याचा साथीदार याचे घरी ठेवली आहे. वरुन त्यास त्याचे नातेवाईकाच्या घरुन ताब्यात व विश्वासात
घेवून विचारणा केली असता त्याने त्याचा इतर साथीदार १) विधिसंघर्षित बालक २) फरार आरोपी युसुफ पठाण नुर
अली पठाण रा. सेल्फी नगर वरुड याचे सोबत मिळुन दिनांक १९/०१/२०२४ दुपारी दरम्यान यावलकर सथागृह वरुड चे
समोरुन ०१ स्प्लेन्डर प्रो मोटर सायकल चोरी करुन फरार साथीदार याचे घरी ठेवली असल्याची तसेच दोन ते तिन
महीन्यात फरार आरोपीचे सोबत त्याने अमरावती, नागपुर, वर्धा सह मध्यप्रदेशातील पांढुर्णा व शिवनी येथुन दुचाकी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. या आरोपींनी





१) पो.स्टे वरुड, जि. अमरावती. गुन्हा.क्रं.३८/२०२४ कलम ३७९ भादवीचे गुन्हयातील स्प्लेन्डर प्रो मोसा क्रं. एमएच २७ ए.यु.९९६३, २) पो.स्टे सावनेर, जि. नागपुर. गुन्हा.क्रं.५३/२०२४ कलम ३७९ भादवीचे गुन्हयातील स्प्लेन्डर प्रो मोसा क्रं. एमएच ४० ए. डब्ल्यु .२६६३,



३ पो.स्टे काटोल, जि.नागपुर. गुन्हा.क्रं. ४९३/२०२० कलम ३७९
भादवीचे गुन्हयातील होन्डा शाईन मोसा क्रं. एमएच ४० बी.व्हाय.. ५६२९,



४) पो.स्टे. जलालखेडा, जि. नागपुर, गुन्हा. क्रं. ०२/२०२० कलम ३७९ भादवीचे गुन्हयातील स्प्लेन्डर प्रो मोसा क्रं.एमएच २७ बी.एच.५९३४,

५) पो.स्टे आष्टी. जि.वर्धा. गुन्हा.क्रं.७०/२०२३ कलम ३७९ भादवीचे गुन्हयातील स्प्लेन्डर प्रो मोसा क्रं. एमएच ३२ एक्स ६३६०,

तसेच मध्यप्रदेशातील पांढुर्णा, शिवनी परीसरातुन चोरी केलेल्या ०३ मोटर सायकलसह एकुण ०८ मोटर सायकली किंमत २,६०,००० /- रु च्या जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास ठाणेदार पो.स्टे वरुड यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक  विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक स्थागुशा  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.नितीन चुलपार, पोलिस  शिपाई गजेंद्र ठाकरे, बळवंत दाभणे, रविद्र बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे, चालक मंगेश मानमोठे, सागर धापट व सरीता चौधरी
यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!