अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा शिरसगाव कसबा पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दारूची अवैध वाहतुक करणार्यावर  शिरजगाव कसबा पोलिसांची धडक कार्यवाही देशीदारू व  अल्टो चारचाकी वाहनासह  आरोपीस घेतले ताब्यात, ४,२९,४०० रू चा मुददेमाल केला जप्त….

शिरसगाव(अमरावती ग्रा.)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी सर्व ठाणेदार यांना अवैध दारू वाहतुक व विकी बाबत प्रभावी कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा चे हददीत सध्या बहीरम यात्रा सुरू असुन सदर यात्रेत अवैध दारू विक्री साठी चारचाकी वाहणात येणार आहे.





अशा मिळालेल्या बातमी वरून बोदड फाटा येथे नाकाबंदी करून २९,४००/- रू देशी दारू व दारू वाहतुक करणे साठी वापरण्यात आलेले चारचाकी अल्टो वाहन क्र MH27BE3037 कि ४,००,०००/- रू असा एकुण ४,२९,४०० रू चा मुददेमाल पकडण्यात आला असुन आरोपी धरमसिंग जयसिंग बावरी वय २८ वर्ष रा.आझाद नगर परतवाडा यांच्या विरूध्द पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा येथे अप नंबर 31/2025 कलम 65 (अ). (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद ,अपर पोलिस अधिक्षक .पंकज कुमावत,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,अचलपुर डॉ. शुभम कुमार  पोलिस निरीक्षक स्था.गु.शा  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात सपोनि महेंद्र गवई ठाणेदार पो. स्टे शिरजगाव कसबा,सफौ सतीश पुनसे, पोहवा भारत कोहळे, सागर जाधव, नापोशि सुनिल खेरडे, पोशि मोहीत चौधरी  यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!