मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ ,अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या
मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणनेकामी सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. दिनांक २५ / १० / २०२३ रोजी पो.उप.नि. मो. तस्लीम व त्यांचे पथकातील अंमलदार हे चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, ग्राम कोंडण्यपुर येथून दिनांक १८/१०/२०२३ रोजी चोरी गेलेली मोटारसायकल ही उमेश कळसकर रा. धामणगाव काटपुर याने चोरी केली आहे. अशा माहितीवरुन सदर पथक धामणगाव काटपुर येथे गोपनिय बातमीदार लावून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता कोंडण्यपुर येथून चोरी गेलेली मोटारसायकल उमेश कळसकर याचे ताब्यात असल्याची माहिती मिळाली वरुन ग्राम नेर पिंगळाई येथून

उमेश महादेव कळसकर वय ३५ वर्ष, रा. धामणगाव काटपुर
ता. मोर्शी जि. अमरावती





यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन बजाज प्लॅटिना कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच ३२ एल ९२३८ कि.अं. ४०,०००/- रु ची ताब्यात घेतली. तसेच अधिक बारकाईने सखोल विचारपुस केली असता त्याने अकोट जि. अकोला येथून चोरी केलेली एक हिरो होंडा स्पेल्डर मोटारसायकल कि.अं. ४५०००/-रु ची जप्त केली. नमुद आरोपीचे ताब्यातुन एकुण ८५०००/- रु चा माल जप्त करुन नमुद आरोपी व मुदेमाल पोलीस स्टेशन कुऱ्हा येथील
अपराध क्रमांक ३३८/२०२३ कलम ३७९ भादंवी चे गुन्हयात ताब्यात देण्यात आले. नमुद आरोपीतांनकडून तपासात अधिक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, अमरावती ग्रामीण, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.निरीक्षक मो.तस्लीम शेख गफुर, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोहेकॉ मंगेश लकड़े, चंद्रशेखर खंडारे, नापोकॉ सचिन मसांगे, सायबर सेल येथील पो. कॉ. शिवा सिरसाठ, रितेश वानखडे यांनी केली.
.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!