
कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना शिरखेड पोलिसांनी दिले जीवनदान…
शिरखेड(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण भागात गोवंश तस्करीच्या घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी संपुर्ण जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.स्टे शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही केली .
पोलिस स्टेशन शिरखेड येथे आज दिनांक २४/११/२०२३ चे सकाळी ०८/०० ते ०९/०० वा दरम्यान गोराला जवळ पेट्रोलिंग करीत असतांना मोर्शी ते अमरावती रोडवर मध्यप्रदेश येथुन येत
असलेला आयचर ट्रक क्रं. CG-07- CK-9782 चा पो.स्टे. शिरखेड पोलीसांनी सापळा रचुन पकडला. सदर ट्रक ची पाहणी केली असता ट्रक मध्ये गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबुन कत्तली करीता
नेत असल्याचे दिसले. ट्रक मध्ये लाकडी पाटयांच्या सहाय्याने दोन कप्पे करुन त्यात कोंबलेले एकुण ५४ जिवंत गोवंश जनावरे कि ८,५५,०००रुव ट्रक किं. १६,००,००० रु एकुण असा २४,५५,००० रु चा माल पोलिसांनी पंचनामा करुन जप्त केला असुन सदर ५४ जनावरे गोशाळा केकतपुर येथे पुढील काळजी व संगोपणाकरीता ठेवण्यात आले आहे. आरोपी क्रं.
१) अल्लाउददीन रज्जाक खान वय ३९ वर्ष रा बडीहोली सारंगपुर जि.राजगड मध्यप्रदेश.


२) उस्मान खान मजीत खान वय ३० वर्ष रा.मुखेलवाडी सारंगपुर, जि. राजगड मध्यप्रदेश.

३) बादशाह खान खुदाबक्ष खान वय ३३ वर्ष रा.गाव पल्ला ता. नुह.जि.नुह. हरीयाणा

यांचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
असुन तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच ट्रक मालकाचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कामगिरी विशाल आनंद पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रा.,
विक्रम साळी अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी डॅा. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.सुरज तेलगोटे ठाणेदार पोलिस स्टेशन शिरखेड, अंमलदार
संजय वाघमारे, नितेश वाघ, गजानन तिजारे, शेख शकुर, व चालक अरुण श्रीनाथ यांनी केली.


