अपघाताचा बनाव करुन त्यामधील गोडेतेलाची विक्री करुन फसवणुक करणे ट्रक मालकास पडले महागात,पोलिसांनी उघड केला बनाव…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अपघाताचा बनाव करून लाखो रूपयाचे तेल चोरून विक्रणारे चोरटे गजाआड….

तळेगाव(द.)अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगांव ( द.) हद्दीत दि. ०६/०१२/२०२३ रोजी ग्राम घुईखेड नजीक चन्द्रभागा नदीचे पुलावर टँकर क्रं. एम. एच. १२ क्यु. डब्लु. ०८७५ ला अपघात होवुन सदर वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली होती. सदर ठिकाणी तळेगांव पोलिसांनी त्वरीत धाव घेवून अधिक माहीती प्राप्त केली असता माहीती मिळाली की सदर चा टँकर ग्रेन आईल घेवून रामदेव बाबा साल्वंट, ब्रम्हपुरी येथुन जळगांव येथे जात होता. घटनास्थळाची पाहणी केली असता सदर अपघात हा बनावट स्वरूपाचा असल्याचा संशय बळावत होता. संशय निर्माण झाल्याने तळेगांव पोलिसांनी अधिक माहीती प्राप्त करण्या करिता रामदेव बाबा साल्वंट, ब्रम्हपुरी कंपनीचे व्यवस्थापक





शे. जाहीद हुसेन बल्द हबीब शेख, वय ५३, रा. ब्रम्हपुरी



यांचेशी संपक साधुन तसेच सदर टँकर चा चालक



इंद्रजीत राजनाथ यादव, वय ३९, रा. सुलतानपुर (उ.प्र.) याची चौकशी करून अधिक माहीती प्राप्त केली असता सदर अपघात हा बनाव असुन टँकर चालक इंद्रजीत राजनाथ यादव, वय ३९, रा. सुलतानपुर (उ.प्र.), ट्रान्सपोर्टर टँकरचे मालक दिलीपकुमार यादव, वय ५० वर्षे रा. मुंबई यांनी संगनमत करून सदर टँकर मधील २५ मेट्रीक टन गोडेतेल किं. २३,२५,७२० /- रूचे इतरत्र विक्री करून कंपनी मालक यांचा विश्वासघात करून अपहार केला असल्याचे निष्पन्न झाल्याने दि. २१/१२/२०२३ रोजी रामदेव बाबा साल्वंट, ब्रम्हपुरी कंपनीचे व्यवस्थापक शे. जाहीद हुसेन वल्द हबीब शेख, वय ५३, रा. ब्रम्हपुरी यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार दिली वरून अपहाराचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे व त्यांचे पथकाने तांत्रीक व संकलीत केलेल्या गुप्त माहीतीचे आधारे सदर गुन्हा उघडकीस आणला असुन वस्तुस्थिती अशी की, टँकर चालक इंद्रजीत राजनाथ यादव, वय ३९, रा. सुलतानपुर (उ.प्र.), ट्रान्सपोर्टर टँकरचे मालक दिलीपकुमार यादव, वय ५० वर्षे, रा. मुंबई यांनी सदर टँकर मधील गोडतेल अमोल इंगळे, वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगांव यास विक्री केले. तसेच सदर बाब कुणाच्याही लक्षात येवु नये करिता टँकरचा पो.स्टे. तळेगांव हद्दीत अपघात होवुन सदर गोडतेल यात नदीपात्रात वाहुन गेल्याचा बनाव केला
होता. गुन्हयाचे तपासात आरोपी नामे

१) दिलीपकुमार यादव, वय ५० वर्ष

२) अमोल इंगळे, वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगांव

यांना अटक करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातुन टँकर, गोडतेल विक्रीतील नगदी ०८,०३,७०० /- , हुंदाई क्रेटा कार असा एकुण ३८,०३,७००/- रूचा माल जप्त करण्यात आला असुन इतर आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे, पुढील तपास तळेगांव पोलिस करित आहेत.
सदरची कार्यवाही  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा,सचिन्द्र शिंदे, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक व ठाणेदार.रामेश्वर धोंडगे,पो.उप.नि.दादाराव पंधरे, पो.अंमलदार सचिन गायधने, संदेश चव्हाण, गोतम गवळी, महीला अमंलदार मेघा चवडे तसेच पो.स्टे. सायबर येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!