कत्तलीसाठी गोतस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
भंडारा (प्रतिनिधी) – अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना तुमसर पोलिसांनी शिताफिने अटक करून २२ गोवंश जातींचे बैल, आणि ट्रक असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी स.पो.नि. केशव पुंजुरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुमसर पोलिस ठाण्यात ४७६/२०२४ कलम ११(१) (ख),(घ),(च) प्रा. नि.वा. सहकलम ५(अ), ९ महा. प्रा.सं. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पथकातील स.पो.नि. केशव पुंजुरवाड, पोहवा. नितीन महाजन, पोहवा. राजेश पंचबुधे, पोना. प्रफुल कठाणे पो.अंमलदार मंगेश माळोदे कार्यालयात हजर असतांना गोपनिय माहिती मिळाली की, गोंदिया कडुन तुमसर मार्गे नानपुरकडे एक ट्रक के.एम.एच. ३५ के ५१२३ हा अवैधरित्या जनावराची वाहतुक करीत आहे, अशी माहीती प्राप्त होताच पोनि. स्थागुशा भंडारा यांच्या मार्गदर्शनात पथक तुमसर कडे रवाना करून नमुद पथक तुमसर येथील खापा चौक येथे सापळा रचुन एक टाटा कंपनीचा ट्रक के. एम. एच. ३५ के ५१२३ थांबवुन सदर वाहन चेक केले असता ट्रकमध्ये लहान दोरीच्या सहाय्याने दाटीवाटीने कोंबुन एकुण २२ गोवंश जातीचे मोठे बैल किं.२,२०,०००/रू. अवैद्यरित्या वाहतुक करताना मिळून आल्याने जनावरांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन त्यांना गोशाळा येथे दाखल करून सुटका केलेली आहे.
गुन्हयातील आरोपी क्र १) तुळशीराम तुलाराम भलावी वय ३४ रा बिसापुर पोस्ट चंदरपुर,का-कुरई जि.- शिवनी आरोपी क्र २)लक्ष्मीकांत सुकराम नेवारे वय ३० रा. राम मंदीर चौक झालुटोला,दवनीवाडा,जि गोंदीया आरोपी क्र ३)आकिब खान आदिब खान वय ३० रा चंगेरा जि गोंदीया(मालक) यांचे विरुध्द पोलिस स्टेशन तुमसर येथे अप. क्रमांक ४७६/२०२४ कलम ११(१) (ख) (ड) (घ) (च) प्रा.नि.वा. सहकलम ५ (अ), ९ महा, प्रा.सं.का. अन्वये नोंद करून आरोपी कं.१ व २ यांना पुढील तपासाकरीता पो.स्टे. तुमसर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नितीन चिंचोळकर,सपोनि केशव पुंजुरवाड पोहवा. नितीन महाजन, पोहवा. राजेश पंचबुधे, नापोशि प्रफुल कठाणे पोशि मंगेश माळोदे यांनी केली