
पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही….
दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा भंडारा यांनी साकोली व पालांदुर येथुन जप्त केला १४.३३.२८३/ रु. वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखू, वाहनासह चार आरोपी घेतले ताब्यात…..
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस अधिक्षक. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना ऑल आऊट ऑपरेशन राबवून सर्व प्रकारच्या अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत हे आपल्या पथकासह पोलिस स्टेशन साकोली कार्यक्षेत्रात अवैध धंदयाबाबत माहीती घेत असतांना त्यांना माहीती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखु मौजा सासरा येथील महेश प्रल्हाद नांदरधने हा स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता आपल्या किराणा दुकानात बाळगुन व्यवसाय करीत आहे.


सदरची मिळालेली माहीती सहा. पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली महेश प्रल्हाद नांदरधने रा. सासरा, ता. साकोली जि. भंडारा याचे किराणा दुकानाची झडती घेतली असता त्याचे किराणा दुकानात १) इंगल हुक्का सिसा सुगंधीत तंबाखु चे ४० पॉकेट प्रत्येकी पॉकेट ४०० ग्रॅम वजनाचा प्रती पॉकेट कि. ६४०/- रु. एकुण किं. २५,६००/- रु.२) मजा १०८ हुक्का सिसा तंबाखु चा २०० ग्रॅम वजनाचा एक डब्बा किं. ९३५/- असा एकुण २६,५३५/- रु. ची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मिळून आल्याने नामे महेश प्रल्हाद नांदरधने, वय ४२ वर्षे, रा. सासरा, ता. साकोली जि. भंडारा याला त्याचेकडे मिळून आला

सदर सुगंधीत तंबाखु बाबतीत बारकाईने विचारपुस केली असता त्याने सांगीतले कि, मी विक्रीकरीता आणून ठेवलेला ईतर मुद्देमाल कटंगधरा येथील संजय नामदेव कापगते यांचे घरी ठेवलेला आहे असे सांगीतल्यावरुन सहा. पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत यांनी महेश नांदरधने यास सोवत घेवुन कटंगधरा येथील संजय नामदेव कापगते याचे राहते घराची प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखु बाबत झडती घेतली असता घरामधे १) मजा १०८ हुक्का सिसा तंबाखु चे २००/- ग्रॅम वजनाचे ४० पॉकेट प्रत्येकी किं. ९३५/-रु. एकुण ३७,४००/- रु. २) होला हक्का सिसा तंबाखुचे २७ प्लास्टीक चुंगळया प्रत्येक चुंगळी मध्ये १ किलो प्रमाणे १० पॉकीट असे एकण २७० पॉकीट प्रति पॉकेट किं. ८२०/- रु. असा एकुण २,२१,४००/- रु. ३) ईगल हुक्का सिसा तंबाखुचे ९ प्लास्टीक चुंगळीमधे ४०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी चुंगळी मधे ११ पॉकेट प्रमाणे ९९ पॉकेट प्रती पॉकेट किं. ६४०/- रु. प्रमाणे असा एकुण ६३,३६०/- रु. अशा प्रकारे दोन्ही आरोपीतांच्या घरी एकूण ३,४८,४९५/- रु. ची सुगंधीत तंबाखु मिळून आल्याने दोन्ही आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन साकोली येथे पुढील कायदेशिर कार्यवाही करणे सुरु आहे.

तसेच दुसर्या एका कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर हे सुध्दा पोलिस स्टेशन पालांदुर कार्यक्षेत्रात ऑल आऊट ऑपरेशन राबवित असतांना त्यांना खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, खुनारी गांवातील नामे हेमंत ऊर्फ गोलु बावणकुळे हा पळसगांव कोलारी येथील भाडयाचे खोलीमधे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखु बाळगुन विक्री करीत आहे. या माहीतीवरुन पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी त्यांचे पथकासह हेमंत ऊर्फ गोलु रमेश बावणकुळे वय २२ वर्ष, रा. खुनारी याचेसह त्याचे ताब्यातील मौजा पळसगांव येथील खोलीची पाहणी केली असता त्या खोलीमधे १) होला हुक्का सिसा तंबाखुचे ३ प्लास्टीक चुंगळी प्रत्येक चुंगळी मधे ०१ किलो वजनाचे १० पॉकेट असे एकुण ३० पॉकेट प्रति पॉकेट किं. ८२०/- रु. असा एकुण २४,६००/- रु. २) ईगल हुक्का सिसा तंबाखुचे ४ प्लास्टीक चुंगळी प्रत्येक चुंगळी मधे ४०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी ११ पॉकीट असे एकूण ४४ पॉकेट प्रती पॉकेट किं. ६४०/-रु. एकुण किं. २८,१६०/- रु. ३) मजा १०८ हुक्का सिसा तंबाखुचे ६ प्लास्टीक बॉक्स प्रति बॉक्स कि. २३५०/- रु. एकुण किं. १४,१००/-रु. ४) रतना छाप सुगंधीत तंबाखु १४ बॉक्स प्रति बॉक्स कि. १,१८०/- रु. एकुण किं. १६,५२०/- रु. ५) पानपराग प्रिमीयम ११ पाँकीट प्रति पांकीट कि. १२०/- एकुण किं. १,४०८/- रु. असा एकुण ८४,७८८/ रु. ची सुगंधीत तंबाखु आणि पान मसाला मिळुन आल्याने हेमंत ऊर्फ गोलु रमेश बावणकुळे यास त्याचेकडे मिळालेली सुगंधीत तंबाखु आणि मानमसाला कुणाकडून खरेदी केला याबाबत विचारपुस केली असता त्याने काहीच वेळापुर्वी संदीप बिलास कावळे रा. अडयाळ याने त्याचेकडील मारुती सुझुकी कंपनीच्या चार चाकी वाहनाने आणुन सोडला असल्याचे सांगीतल्याने.अड्याळ येथील संदीप विलास कावळे यास त्याचे मालकीचे मारुती सुझुकी कंपनीचे FRONX गाडी क्र. MH 36 AL 3151 अंदाजे किं. १०,००,०००/- रु. सह ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन पालांदुर येथे पुढील कायदेशीर कारवाई करणे सुरु आहे.तसेच दोन्ही प्रकरणातील आरोपींकडे मिळून आलेल्या सुगंधीत तंबाखु संबंधाने विचारपुस करण्यात येत असुन त्यांना तंबाखु पुरविणाऱ्या आरोपींची माहीती घेवुन त्यांना सुध्दा गुन्हयात अटक करण्यात येणार आहे.
सदरच्या दोन्ही कारवाई पोलिस अधिक्षक. नूरुल हसन यांचे मार्गदशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहा. पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड स्था. गु. शा. भंडारा दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत, सहा. फौजदार कुरंजेकर, पोहवा गभणे, पोशि अमोल कापगते, चामपोशि वंदना खेडकर, पोहवा डहारे, महाजन, पोहवा देशमुख, मते, पोशि देशमुख, माळोदे, भित्रे, चालक हवालदार खराबे, तिवाडे आणि चालक पोशि गजभिये यांनी केलेली आहे.


