अवैधरित्या गांजाची विक्रीकरीता वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत
गांजासह एकास केली अटक…
भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख २२ हजारांचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. अरूण पाटील (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड मोहाडी, आणि एक २५ वर्षाचा अनोळखी इसम असे दोघांना पकडुन त्यांच्यावर फिर्यादी सपोनि. नारायण तुरकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम ८८/२०२४ कलम २०(ब), ८ (क), २९ एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१६ मार्च) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांचे पथक मोहाडी परीसरात अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता सोबत पोहवा गजभिये, पटोले, पंचबुध्दे, बेदुरकर नाचापोशि तिवाडे हे स्थागुशा भंडारा यांचे आदेशान्वये मोहाडी पोलिस स्टेशन. परीसरात पेट्रोलींग करीत असतांना दुपारी २.३० वाजता दरम्यान ग्राम पारडी ते चौडेश्वरी माता मंदीर मोहाडी कडे जाणा-या रोडने पेट्रोलींग करीत असतांना पोलिस रेकॅार्डवरील ईसम नामे अरूण राजू पाटील (वय ३५ वर्ष), रा.शिवाजी चौक, मोहाडी हा आपल्या एका साथीदारा सोबत एका काळ्या रंगाच्या हिरो होन्डा स्पेलंडर मोटारसायकलने येताना दिसला त्यांचे दोघांच्या मधोमध मोटार सायकलवर एक पांढ-या रंगाची चुगळी दिसुन आल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे जवळील पांढरी चुंगळी रस्त्याचे कडेला फेकुन मोटारसायकलला यु टर्न मारून तेथुन पळून गेले. पळून गेलेला ईसम हा रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी गांजा अंमली पदार्थ विक्री व वाहतुकीचे गुन्हे नोंद असल्याने तसेच मौक्यावर फेकुन दिलेल्या पांढ-या रंगाच्या चुंगळीतुन उग्र वास येत असल्याने चुंगळीत गांजा अंमली पदार्थ असल्याबाबत दाट संशय आल्याने वरीष्ठांचे आदेशान्वये शासकीय पंच, राजपत्रीत अधिकारी, वजन मापारी, फोटोग्राफर, डॉग हॅन्डलर यांना मोक्यावर बोलावुन कार्यवाही केली असता घटनास्थळी मिळुन आलेल्या एका पांढ-या रंगाच्या चुंगळीत १२.२४५ किलो ग्रॅम गांजा किंमती १,२२,४५०६-/- रू मिळुन आल्याने गुन्ह्यात फरार आरोपी नामे अरुण राजु पाटील (वय ३५ वर्ष), रा.शिवाजी वार्ड मोहाडी व त्याचा साथीदार अनोळखी ईसम (वय अं.२५ वर्ष) यांच्यावर पोलिस स्टेशन मोहाडी येथे अप क्रमांक ८८/२०२४ कलम २० (ब), ८ (क), २९ एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदिप. पुल्लरवार पो.स्टे. मोहाडी हे करीत असुन गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सपोनि नारायण तुरकुंडे, बाहतुक शाखा, भंडारा, पो.हवा. रमेश बेदुरकर, कैलास पटोले, रोशन गजभिये, राजेश पंचबुधे, नाचापोशि आशिष तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे. भंडारा जिल्हायात अंमली पदार्थाची विक्री, पुरवठा अथवा साठा करणा-यांवर कार्यवाही होण्याकरीता आपले परीसरात कुठेही अंमली पदार्थाची विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास जनतेनी तात्काळ जवळील पोलिस स्टेशनला माहीती देण्याबाबत पोलिस अधीक्षक, भंडारा लोहीत मतानी यांनी आवाहन केले आहे.