
भंडारा पोलिसांची रेती तस्करांवर मोठी कार्यवाही,एक कोटीचेवर मुद्देमाल केला हस्तगत…
अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर कारधा पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त…
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार अवैध उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर कडक कार्यवाहीचा भाग म्हनुन दि १८ जानेवारी रोजी कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ते अवैद्य रेती वाहतुक बाबत मिळालेल्या गुप्त माहीती वरून पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ हे स्टॉफसह कारधा चौक येथे सापळा रचुन तसेच एक पथक साकोली टोलनाका येथे थांबविले


सदर गोपनीय खबरीकडुन मिळालेल्या वाहन क्रमांकाची तपासणी करुन त्यांनी दिलेल्या माहीतीवरुन कारधा चौक येथे नाकाबंदी केली असतांना लाखनी कडुन भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर एनएच 53 रोडने (1) ट्रक क्र. MH 37 W 7776 चे चालक आरोपी संतोष भारत चव्हाण वय 32 वर्षे रा. म्हसनी ता. मानोरा जि.वाशिम ने आरोपी क्र. 4 मुकेश सच्चानंद थड्डानी वय 42 वर्षे रा. कारंजा/लाड जि. वाशिम (मालक),च्या सांगण्यावरून (2) ट्रक क्र. MH 30 BD 7029 चे चालक आरोपी शेख अकबर शेख अजगर वय 30 वर्षे रा. शतरंजीपुरा बाळापुर जि.अकोला ने आरोपी क्र. 5 निलेश रमेशराव अनवाडे वय 40 वर्षे रा. हिंगणारोड, अकोला (मालक) च्या सांगण्यावरून ट्रक मध्ये रेती आणल्याचे सांगुन व (3) ट्रक क्र. NL 01 AM 4862 चे चालक आरोपी(फरार) ने आरोपी क्र. परविंदरसिंग जगतारसिंग ढिलोंन रा. गणराजनगर बाफना रोड, नांदेड (मालक)यांचे सांगण्यावरून ट्रक मध्ये रेती आणल्याचे सांगुन स्वतःचे नाव गाव न सांगता घटनास्थळावरून अंधाराचा व हॉयवेवरील वाहतुकीचा फायदा घेवुन पळुन गेला

सर्व आरोपींनी पर्यावरणाचा ऱ्हास करून विनापासपरवाना छत्तीसगढ येथील अवैद्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करतांना ट्रक क्र. MH 37 W 7776 कीमती 50,00,000/रू. व त्यामधील 10 ब्रास रेती कीमती 60,000/रू. 2) ट्रक क्र. MH 30 BD 7029 कीमती 50,00,000/रू. व त्यामधील 10 ब्रास रेती कीमती 60,000/रू. 3) ट्रक क्र. NL 01 AM 4862 कीमती 30,00,000/रू, व त्यामधील 10 ब्रास रेती कीमती 60,000/-रू. असा एकुण 1,31,80,000/रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून विविध कलमान्वये आरोपीविरुद्ध विरूध्द सदरचा गुन्हा नोंद करून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान गुन्ह्यात एकुण 1,31,80,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारधा पोलिसांनी अवैद्य रेती चोरी करणाऱ्यांवर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कारवाई करून एकुण 1,31,80,000/रु. (1 कोटी 31 लाख 80 हजारांचा) मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा. त्र्यंबक दामोदर गायधने (वय 45 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारधा पोलीस ठाण्यात 11/2024 कलम 303(2),49 भा.न्या.सं. सहकलम 48(8), महा. जमीन महसूल अधिनियम सहकलम 7,9 पर्यावरण संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, पोहवा. दिलीप धावडे, त्र्यंबक गायधने, रत्नाकर लाडे, पोशि सचिन बावनकुळे पो.स्टे. कारधा यांनी पार पाडली आहे.


