पोलिस अधिक्षकांच्या सतत होणार्या कार्यवाहीने रेती माफीया दणाणले धाबे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैध रेती वाहतुक करणारा एलपी ट्रक चालकावर सिहोरा पोलीसांची कारवाई एकूण ४०,०९,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त………

सिहोरा(भंडारा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या नजीकच्या जिल्ह्यात होणारी रेती तस्करी थांबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहे व तसे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले आहेत





त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी पोलिस निरीक्षक विजय कसोधन ठाणेदार पोलिस स्टेशन सिहोरा हे त्यांचे सहकारी कर्मचारी यांचेसोबत गस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे मौजा सिहोरा येथे एक एलपी ट्रक क्र. MH40CD3627 मध्ये चालक अंकीतकुमार ददन यादव वय अंदाजे ३० रा. दौलतपुर त. जि. भोजपुर बिहार हा मध्यप्रदेशातुन अवैद्यरीत्या रेती भरुन महाराष्ट्र राज्यात वाहतुक करतांना मिळून आला



त्यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता मध्यप्रदेशातील ई टिपी परवाना सादर केला परंतु महाराष्ट्र राज्यातील रेती वाहतुकीचा परवाना सादर न केल्याने सदर आरोपी हा त्याचे ट्रक मध्ये अवैधरित्या रेती भरुन महाराष्ट्र शासनाचे महसुल बुडवीण्याचे उद्देशाने रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन ४.५ ब्रास रेती कीमती ९०००/- रू.व एलपी ट्रक क्र. MH40CD3627 किंमती ४०,००,०००/-असा एकुण ४०,०९,०००/- रु चा माल मीळुन आल्याने सदर आरोपी ट्रॅक चालक याचेवर अपराध क्र. १५/२५ कलम ३०३ (२) भा. न्या. स. सन २०२३ सहकलम ४८ (८) जमीन महसुल संहीता सन १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी  पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजय कसोधन ठाणेदार, पो. हवा. राजु साठवणे पो.शि तिलक चौधरी चापोहवा. छबीलाल शरणागत  यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!