IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
आयपीएल सट्ट्यावर बुलढाणा एलसीबीची कारवाई; मुद्देमाल जप्त…
बुलढाणा (प्रतिनिधी) – सध्या चालू असलेला मोठा क्रिकेटोत्सव म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सव मानला जातो, मात्र एकीकडे सट्टेबाज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लाऊन लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. कायद्याने सट्टा लावणे गुन्हा आहे, अवैध आहे, तरीसुद्धा काही ठिकाणच्या अड्ड्यांवर सट्टेबाजांची टोळी असते. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर, जानेफळ व देऊळगाव राजा हद्दीत सुद्धा विविध ठिकाणी क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
तेव्हा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपी – (1) शेख फहीम शेख सलीम (वय 40 वर्षे) रा.अमडापूर, (2) शेख इमरान शेख अक्तर (वय 29 वर्षे), रा.मोळा ता.मेहकर, (3) आसीफ खान शफीर खान (वय 33 वर्षे), रा.जानेफळ, (4) रोहित रामदास शिंदे (वय 24 वर्षे) रा.जानेफळ, (5) सैयद सैयद सैयद हबीब रा.उपलब्ध गाव महीता, दे.राजा या 5 सट्टेबाजांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 44 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात अवैधरित्या सुरु असलेले इंडियन प्रिमीयर लिग क्रिकेट (आयपीएल) मॅचेस वर सट्टा खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर धडक कारवाई करणेबाबत सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. सदर संबंधाने पोनि.अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विवीध स्वतंत्र पथके तयार करुन, नमुद पथकांना जिल्ह्यामध्ये इंडीयन प्रिमीयर लिग (आयपीएल) मॅचेसवर सट्टा खेळणारे आणि खेळविणाऱ्या ईसमांची गोपनीय माहिती काढून, त्यांचेवर रेड कारवाई करुन कायदेशीरपणे कारवाई करणे संबंधाने सुचना दिलेल्या होत्या.
तेव्हा सदर संबंधाने (दि.14एप्रिल) रोजी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. अमडापूर, पो.स्टे. जानेफळ (ग्राम हिवरा खुर्द) आणि पो.स्टे. देऊळगांव राजा (ग्राम देऊळगांव महि) येथे आय.पी.एल. सट्टा खेळणारे व खेळविणाऱ्या ईसमां विरुध्द कारवाई करण्यात आली. या नमुद कारवाईमध्ये एकूण नगदी रोख, मोबाईल फोन आणि ईतर साहित्य किं. 1,44,290/-रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त करुन, एकूण 05 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीं विरुध्द पो.स्टे. अमडापूर, पो.स्टे. जानेफळ, पो.स्टे. देऊळगांव राजा येथे महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम 12 (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि.आशिष चेचरे, पोउपनी. सचिन कानडे, पोउपनी. रवि मोरे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा हे करीत आहेत.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अंधिक्षक, खामगाव अशोक थोरात अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे-प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. यांचे नेतृत्वात, सपोनि.आशिष चेचरे, पोउपनि.सचिन कानडे, रवि मोरे, सफौ. गजानन माळी, पोहवा.दिनेश बकाले, पोशि जयंत बोचे, दिपक वायाळ स्था.गु.शा-बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली आहे.