सराईत घरफोड्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील दागीणे

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोड्या करणा-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवुन सोन्याचे दागीने केले जप्त…..

चंद्रपुर(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०३ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलिस स्टाफ पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय माहीतीगाराव्दारे गोपनीय माहीती मिळाली की,काही संशईत ईसम संशईतरित्या रयतवारी कॉलनी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबरे वरून नमुद ठिकाणी जाऊन आरोपी १) राकेश सुब्रहमण्यम सानिपती, वय-३४ वर्ष, धंदा-मजुरी, रा. तेलगु शाळेजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, २) बिश्वजीत बिमल सिकदर, वय-३२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. बंगाली कॉग्प, पाण्याचे टाकीजवळ, चंद्रपुर, ता. जि. चंदपुर, ३) दिपक राजु भोले, वय-२१ वर्ष, धंदा-मजुरी, रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी यापुर्वी पोलिस स्टेशन, भद्रावती तसेच पोलिस स्टेशन, रामनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले.





त्यावरून नमुद आरोपींना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागीने हे सराफा सोनार मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विक्री केले असे सांगितले वरून नमुद सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपींकडुन सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३,७१,३००/- रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन, पोलिस अधिक्षक रिना जनबंधु  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि, संतोष निंभोरकर,पोउपनि विनोद भुरले,पोहवा. सतिश अवथरे, नापोशि संतोष येलपुलवार,पोशि गोपीनाथ नरोटे,नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!