
मोटारसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त….
चंद्रपूर (प्रतिनिधी)- चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत होत्या म्हणून पोलिसांनी त्या अनुषंगाने खोल तपास करून राजूरा, बल्लारशाह, गडचोदुर, चंद्रपुर तसेच पो.स्टे.आष्टी, मुलचेरा, कुरखेडा या बरोबरच गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5,00,000 रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या मोटारसायकील पोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता रविंद्रसिंग परदेशी, पोलिस अधिक्षक, रिना जनचंधु, अपर पोलिस अधिक्षक , यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलिस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करुन गोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे महेश कोडावार, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु होती. सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनीय बातमीदार कार्यान्वित केले. दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनूसार दोन इसम विना कागदपत्रांची व विना नंवर प्लेटची मोटारसायकल विक्रीकरीता कामगार चौक, बायपास रोड, चंद्रपुर येथे फिरत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून आरोपी नामे आरोपी

1) अक्षय वासुदेव भलवे वय 24 वर्ष

2) मंगेश संजय मडावी (वय 19 वर्ष), रा.राजठाकुर मोहल्ला, आष्टी, जि.गडचिरोली
३) रोहीत विनोद लोनगाडगे (वय 19 वर्ष), रा.नांदाफाटा, ता.गंडचांदूर, जि.चंद्रपुर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन मोटरसायकली हस्तगत केल्या.
या मध्ये त्यांच्याकडून एकुण 5,00,000 रु.चा मुद्देमाल जप्त करून नमुदप्रमाणे पो.स्टे. राजूरा, बल्लारशाह, गडचोदुर जि. चंद्रपुर तसेच पो.स्टे. आष्टी, मुलचेरा, कुरखेडा जि. गडचिरोली येथील दाखल असलेले मोसा चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी पोलिस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे व सिसिटिनएस चे पोहवा गोपाल पिंपळशेन्डे व सायबर पथक यांनी केली आहे.


