
सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली येथे जाऊन केली अटक…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली जिल्हयातील सराईत मोटारसायकल चोरट्यास घेतले ताब्यात,आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता…..
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे
शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश
कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे.
शाखा,चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोटारसायकल चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे कुरखेडा जि. गडचिरोली येथे जावुन सापळा रचून सराईत मोटारसायकल चोरटा आरोपी नामे आरोपी नामे गोकुल सुभाष यावलकर वय 23 वर्षे रा. राणा प्रताप वार्ड, कुरखेडा जि. गडचिरोली यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन खालील प्रमाणे मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस स्टेशन घुग्गुस अप क्र 34/24 कलम 379 भादवि 1 मोसा.
|एक सिल्वर व केसरी रंगाची केटीयम ड्युक विना क्रमाकाची गाडी
जिचा चेसीस क्रं MD2JPEXA7PC034662, व ईंजीन नं P-937 *09236* असलेली अंदाजे किंमत 50000/-₹ जप्त करण्यात आलेली मोटारसायकल व आरोपी पोस्टे घुघ्घुस यांचे ताब्यात देण्यात आले असून पो.स्टे. घुग्घुस येथील दाखल असलेली मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगीरी रविंद्रसिंग परदेशी पोलिस अधिक्षक चंद्रपूर,रीना जनबंधु अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात पो.उप.नि. विनाद भुरले, पो.हवा.संजय आतकुलवार,नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.




