सावली हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल…..

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले आहेत त्याअनुषगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते





त्यानुसार दिनांक दि.(५)रोजी सपोनि हर्षल एकरे व पोलिस पथक असे पोलिस स्टेशन, सावली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, विक्की सुरेश गोडसेलवार हा त्याचे घरा समोर हुडाई आय २० कंपनीची चार
चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साठवुन ठेवल्याच्या खबरे वरून नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये १५०० नग देशी दारू, २४ नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी २,००० एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, १०० नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी ९० एम.एल. मापाने भरलेली विदेशी, २४ नग रॉयल कंपनीची प्रत्येकी ३७५ एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, २४ नग आयकॉनीक वाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम.एल. मापाने भरलेली तसेच ४८ नग हॅवर्ड ५००० कंपनीची बियन प्रत्येकी ५०० एम.एल. मापाने भरलेली असा एकुण १,२५,३६० /- रु माल तसेच गुन्हयात वापरलेली हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१
किमंत ८,००,०००/- रूपये असा एकुण ९,२५,०००/- रुपयाचा माल जप्त केला. सदचा माल हा नरसिंग उर्फ नरसिंग अन्ना गनवेनवार, रा. मुल, जि. चंद्रपुर याचा असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन, सावली यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे,पोहवा जयंता चुनारकर, रजनिकांत पुट्ठावार, सतिश अवथरे, नापोशि चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!