
अवैध देशी कट्ट्यासह गंगापुर पोलिसांनी एकास घेतले ताब्यात….
गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपीला गंगापुर पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद….
गंगापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस ॲक्शन मोडवर आलेले आहे त्यानुसार अवैध धंदे,अवैध शस्त्र यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते


त्याअनुषंगाने दिनांक 01/04/2024 रोजी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, गंगापुर ते वैजापूर जाणारे हायवे वर असलेल्या हॉटेल अन्नपुर्णा समोर एक व्यक्ती हा दारुच्या नशेत तर्रट असुन त्यांची हालचाल ही संशयास्पद आहे. तसेच त्याचे कमरेला गावठी कट्टा त्यांने लावलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेवुन हॉटेलच्या परिसरात येताच हॉटेलच्या बाहेर एक ईसम हा संपुर्ण पणे दारु पिऊन गोंधळ घालतांना नजरेस पडला. त्याची हालचाल हि संशयास्पद दिसुन आल्याने पोलिसांनी त्याचे दिशेने धाव घेवुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्या तोंडाचा उग्रवास येत असल्याने त्यांने दारूचे अती सेवन केल्याचे समजुन येत होते.
यावेळी त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अडखळत त्याचे नाव कानिफनाथ माणिक मावस वय 38 वर्ष रा. भिवधानोरा ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक स्टिलच्या धातुचा काळया रंगाचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस (राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आला आहे. गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असे एकुण 31,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यावरुन त्याचे विरूध्द पोलिस ठाणे गंगापुर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायद्या व कलम 85 (1) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलिस करित आहेत. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्हयात भादंवी कलम 302 अन्वये सारखा गंभीर गुन्हा दाखल असुन त्याचप्रमाणे अवैधरित्या दारू विक्री करणे, जुगार यासारखे सुध्दा गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,अपर पोलिस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार,उपविभागिय पोलिस अधिकारी, गंगापुर दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले,सहा.पोलिस निरीक्षक, केदारनाथ पालवे, पोलिस उपनिरीक्षक,सुभाष झोरे, पोलीस अंमलदार अमोल कांबळे, दिनकर थोरे, अभिजीत डहाळे,तेन्सिंग राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.



