
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक…
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक…
पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या तिघांना देहूरोड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर एका तासातच आरोपी नामे दिपक दत्तात्रय शेलार, (वय ३३ वर्षे) रा.देहूगांव, विठ्ठलवाडी, कब्बडी ग्राऊंड शेजारी, पुणे याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांचे साथीदार गुन्हा केल्यापासून फरार होते. सदर आरोपींचा शोध घेणे कामी देहूरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करण्यात आली होती. या टीमने कौशल्यपूर्ण तपास अन् अथक परिश्रम करून देहूगांव येथील विठ्ठलवाडीच्या डोंगराळ भागातुन त्या तिघांना अटक केली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, देहुरोड पोलिस स्टेशन येथे गु.रजि.नं. २७९/२०२४ भा.दं. वि.कलम ३०७,३२४,५०४,५०६,३४ आर्म अँक्ट ४ (२५) (२७) अन्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर एक तासातच आरोपी नामे दिपक दत्तात्रय शेलार, (वय ३३ वर्षे) रा.देहूगांव, विठ्ठलवाडी, कब्बडी ग्राऊंड शेजारी, पुणे याला पोलीसांनी अटक केली होती. परंतु त्याचे साथीदार गुन्हा केल्यापासुन फरार होते. सदर आरोपींचा शोध घेणे कामी देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करण्यात आली होती. त्यांचे तपासामध्ये आरोपी हे अंबरनाथ, कल्याण, ठाणे, घाटकोपर, मुंबई पुणे असे सतत ठाव ठिकाणा बदलुन लपुन राहत होते. त्यामुळे त्यांना पकडणे मुश्कील झाले होते. सदर तपास पथकाने अथक परिश्रम करून आरोपी यांना देहूगांव येथील विठ्ठलवाडीच्या डोंगराळ भागातुन आरोपी नामे १) कुंदन संदिप थोरात (वय २५ वर्षे) २) अनिकेत संतोष विटकर (वय १९ वर्षे) ३) रोहन दुंदा चिमटे (वय २१ वर्षे) तीघे रा.विठ्ठलवाडी देहुगांव, ता.हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपींची (दि.०१जुलै) पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग देवीदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी केली आहे.



