
युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
धाराशिव (प्रतीक भोसले): युवकाला एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली की, मी तुझे ते फोटो फेसबुकला टाकीन, तुझा काय फायदा नाय, तुझी बायको पळून गेली आहे. मी तुझा बाप आहे, असे म्हणून घरच्यांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हयातील कळंब येथील एका २६ वर्षीय युवकाला (नाव – गाव गोपनीय) रात्री लातूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने फोन करून मी तुझे फोटो फेसबुकला टाकीन असे म्हणून फोन कट केला. आणि त्यांनी त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स ॲप स्टेटस टाकले की, तू __ आहेस, तुझी बायको पळून गेली आहे, मी तुझा बाप आहे, तसेच एका ॲप्लीकेशनवर (नाव गोपनीय) आई, वहिनी, चुलती आणि फिर्यादीचे अश्लील फोटो टाकून ॲप्लीकेशनवर चॅटिंग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.


फिर्यादीने त्याला जाब विचारला की, ‘तू आमची बदनामी का करत आहे. तुला माझ्याकडून काय पैसे पाहिजेत का?’ असे म्हणल्यावर त्याने शिवीगाळ करून तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. फिर्यादीने कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध भा.दं.सं. कलम ५००,५०१,५०७, आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ अंतर्गत गुन्हा नों



