
खबरदार – अल्पवयीन मुलांना दारु विक्री कराल तर शिक्षेस पात्र व्हाल…
पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलांना देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या संबंधीत दुकान मालकावर कार्यवाहीचा बडगा…


धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (24) रोजी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशान्वये जे कोणी दारु (मद्य) विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन येईल अशा मद्यविक्री दुकानाचे चालक व मालक यांच्यावर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

त्याप्रमाणे दिनांक 24/05/2024 रोजी संध्या 7.00 वा चे सुमारास धुळे शहर उपविभागातील धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील (1) चितोड रोड वरील वाईन शॉप (2) धुळे महानगर पालिका समोरील
वाईन शॉप, चाळीसगांव रोड पोलिस ठाणे हद्दीतील (1) पुनम वाईन शॉप (2) सत्यम वाईन शॉप, मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील (1) श्रध्दा वाईन शॉप (2) राजेश व नियती बिअर बार, पश्चिम देवपुर पोलिस ठाणे हद्दीतील (1) वाईन सेंटर वाईन शॉप नकाणे रोड, देवपुर पोलिस ठाणे हद्दीतील (1) महाराष्ट्र वाईन शॉप, आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील (1) क्वालीटी वाईन शॉप अशा ठिकाणी संबंधीत पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला होता.
सदर सापळा कारवाई मध्ये देवपुर पोलिस ठाणे हद्दीतील (1) महाराष्ट्र वाईन शॉप आझाद नगर पोलिस ठाणे हद्दीतील (1) क्वालीटी वाईन शॉप येथील मद्यविक्रेते हे बेकायदेशीरपणे 18
वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन आल्याने त्यांच्यावर देवपुर पोलिस ठाणे हददीतील महाराष्ट्र वाईन शॉप येथील (01 ) चालक – जगदीश प्रधानमल गलाणी (2) नोकर –
ऋतीक भरत शर्मा (3) मालक – विना जगदीश गलाणी यांच्या विरुध्द देवपुर पोलिस ठाणे येथे गुरनं 157/2024 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा – 2015 चे कलम 77, 78 सह
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 82 अन्वये तसेच आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील (1) क्वालीटी वाईन शॉप येथील (1) मॅनेजर – चुनीलाल मंगतराम सेवाणी (2) सेल्समन – विक्की
किशनचंद लुंड यांच्या विरुध्द आझादनगर पोलिस ठाणे येथे गुरनं 153/2024 अल्पवयीन न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) कायदा – 2015 चे कलम 77 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे

सदरची कारवाई ही.पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी, यांनी व त्यांचे आदेशाने आझादनगर पोलिस ठाणे येथील प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच देवपुर पोलिस ठाणे येथील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


