गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली-  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­र्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आज दिनांक 06/09/2023 रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व पोलिस अंमलदार प्रशांत गरफडे,  श्रिकृष्ण परचाके,  श्रीकांत बोईना, चालक पोलिस हवालदार मनोहर तोगरवार यांचे सह शासकिय वाहनाने रवाना झाले असता,  आकाश भरडकर हा ईसम दामदेव मंडलवार आणि त्यांचे 02 मुले नीरज मंडलवार व निखिल मंडलवार हे चालवीत असलेल्या राज बार येथून दारुचा मुद्देमाल घेऊन चारचाकी सुमो वाहनाने गडचिरोली शहरात आणणार आहे. अश्या गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे मुल रोडवर शोध घेत असतांना सदर संशयित वाहन सेमाना बायपास मार्गे पोटेगाव रोड व तिथुन चातगावकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता, वाहनात असलेले 02 अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर वाहनाची (किंमत अंदाजे 5,00,000 रुपये) पाहणी केली असता, त्यात विदेशी दारु व बियर किंमत 3,24,000/- रुपये असा एकुण 8,24,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत पोलिस स्टेशन गडचिरोली येथे

1) आकाश भरडकर,





2) निखील मंडलवार,



3) निरज मंडलवार



तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध कलम 65 (अ), 83, 98 (2) महा. दा. का. सह कलम 353, 332 भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्रातील पुढील तपास सपोनि. आव्हाड करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!