
पोलिस अधीक्षकांचे पुढाकाराने दुर्गम भागातील युवक धावले मानाच्या मुंबई मॅराथॅानमधे…
टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक,
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी….
गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलिस दल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने, गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील 25 युवक-युवती व पोलिस अधिकारी/अंमलदार यांनी दिनांक 21/01/2024 रोजी मुंबई येथे होत असलेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये 42 कि.मी (फुल मॅरेथॉन) व 21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन) करीता सहभाग नोंदविला.


मुंबई येथे दरवर्षी टाटा मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या मॅराथॉन स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. सदर मॅराथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्रातील अतीदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी 61 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 25 युवक-युवतींची निवड करुन गडचिरोली पोलिस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहीत्य वाटप करुन राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ प्रशिक्षकांकडुन योग्य सरावाचे नियोजन करुन दोन महिण्याचे निवासी प्रशिक्षण पोलिस मुख्यालय येथे देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरीता कसुन सराव घेण्यात आला. यामध्ये 21 किमी, 25 किमी, 35 किमी व 42 किमी. धावणे, स्टेन्थनिंग एक्सरसाईज, एबीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज इ. शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धमध्ये 42 किमी. गटात गडचिरोलीचे पोनि. कुंदन गावडे, परिपोउपनि. धनराज कोळी, परिपोउपनि. शामरंग गवळी, परिपोउपनि. मयुर पवळ, जय नलेश्वर नंदनवार, टिंकु चंद्रभान चलाख, रोहन संजय भुरसे, अमोल रविंद्र पोरटे, सुमीत दिगांबर चौधरी, सागर नानाजी दुर्गे, विशाल सत्यवान रामटेके, तुषाल शंकर गावतुरे, संपतराव लच्चा ईष्टाम, यश राजु भांडेकर, दिनेश व्यंकटी मडावी, अमीत विश्वनाथ कावडे, योगश जंतुराम चनाप, सुरज लुल्ला तिम्मा, अभिषेक सुरेश कुमरे, पियुष सोनुले, सौरभ कन्नाके तसेच प्रकाश रमेश मिरी (42 किमीमध्ये 2 तास, 54 मी.), सुरज साईनाथ बोटरे (42 किमीमध्ये 2 तास, 54 मी.) आणि 21 किमी. या गटात नापोअं/5790 शांताराम सपकाळ व प्रियंका लालसु ओकसा (21 किमीमध्ये 1 तास, 37 मी.) यांनी सहभाग नोंदविला.
टाटा मुंबई मॅराथॉन स्पर्धेत गडचिरोलीचे युवक सहभागी झाले यासाठी पोलिस अधीक्षक. नीलोत्पल अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक अहेरी. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. भारत निकाळजे, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार तसेच प्रशिक्षक सफौ./जांगी, नापोअं./पवार यांनी अथक परिश्रम घेतले.



