
सराफ दुकानात चोरी करणाऱ्यास छत्तीसगड राज्यातुन घेतले ताब्यात…
गोंदींया येथील सराफ दुकानात चोरी करुन सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास गोंदिया शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या,मुद्देमालासह आरोपीस घेतलं ताब्यात….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी आकाश कैलाशचंद्र अग्रवाल, वय 48 वर्षे रा. गणेशनगर गोंदिया यांनी गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की त्याच्या मालकीच्या आकाश ज्वेलर्स ह्या दुकानात दिनांक – 29/09/2024 रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा एकुण-56,700/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केला यावरुन आकाश कैलाशचंद्र अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन पो . ठाणे गोंदिया शहर येथे दिनांक 29/09/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता


नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांचे आदेशाप्रमाणे गोंदिया शहर पोलीस ठाणे चे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय सुत्राच्या आधारे नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन आरोपी संशईत लोकेश कपील श्रीवास, वय 33 वर्षे, रा.कैलाशनगर,कवर्धा जि. कबीरधाम (छ.ग.) यास सदर गुन्ह्यांत निष्पन्न करुन ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदर आरोपीने सदरची गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीस गुन्ह्यात दिनांक- 30/09/2024 रोजी अटक करुन त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा 56,700/- रुपयाचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटर सायकल पल्सर किंमती १.०००००/- रुपये, इलेक्ट्रीक कटर (ड्रील मशीन) किं.2000/- रू, स्क्रू डावर किं. 50/- रु. व एक काळी बॅग किंमती 1000/- रु. असा एकुण किमती 1,59,750/- रु. चा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आला

गोंदिया शहर पोलीसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे… सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. दिपक राहांगडाले हे करीत आहेत. नमूद आरोपी याचे विरुध्द विवीध राज्यात सोन्या-चांदी चोरीचे 8-9 गुन्हे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपीने पो.स्टे. गोंदिया शहर हद्दीत आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याबाबत गोंदिया शहर पोलीस अधीकचा तपास करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया, साहील झरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलिस निरिक्षक किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि. सुभाष सोनवाने, मुकेश रावते, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी केली आहे.


