विदेशी बनावटीच्या पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या अग्निशस्त्र ( विदेशी बनावटीची पिस्तुल) बाळगणाऱ्यास पिस्तुल, व 5 जिवंत काडतूसा-सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गोंदिया(प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे कारवाई करत श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथील राहणारा ईसंम विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर, यास विदेशी बनावटीची पिस्तुल, मॅगझिन, व 5 जिवंत काडतूसा-सह केले जेरबंद





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांचे निर्देशानुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर लगाम लावण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा याकरीता गुन्हेगारांवर कारवाई करुन विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहेत



या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.(10) रोजी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी प्राप्त झाली की श्रीनगर चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथील इसमांकडे अग्निशस्त्र असून तो त्याची विल्हेवाट लावणार आहे अश्या प्राप्त खात्रीलायक बातमीची सत्यता पडताळून वरिष्ठांना याबाबत कळवून वरिष्ठांचे  मार्गदर्शनात कारवाई केली असता ईसंम विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर वय 28 वर्षे राहणार श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया  याचे ताब्यात त्याचे राहते घरी विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन, आणि 5 जिवंत काडतुसासह अवैधरित्या प्रतिबंधित अग्निशस्त्र मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे त्यास त्याचे जवळ ताब्यात अवैधरित्या मिळुन आलेल्या पिस्तूल बाळगन्याबाबत विचारणा, चौकशी केली असता त्याने समाधानकारक असे कोणतेच .उत्तर दिले नाही  त्याचेविरूध्द पोलिस ठाणे गोंदिया शहर येथे भारतिय हत्यार कायदा कलम 3, 25, सहकलंम 135 मपोका अन्वये पो . ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्र.296/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.. गुन्हेगार आरोपी यास जप्त पिस्तुल मुद्देमालसह गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असुन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पुढील कायदेशीर कारवाई तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. विजय शिंदे, पो. उप. नि. महेश विघ्ने, म.पो.उप.नि. वनिता सायकर, पो.हवा.राजु मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, तुलसी लुटे, नेवालाल भेलावे, इंद्रजित विसेन, रियाज शेख, पो. शि. संतोष केदार, यांनी कारवाई केलेली आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!