गुप्तधन काढुन देतो अशी बतावनी करुन ७लक्ष रु ची फसवणुक करणाऱ्या २ मांत्रिकास पालघर येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 08-09-2023 ते 13- 10-2023 चे दरम्यान देवरी अंतर्गत ग्राम खुर्सीपार येथील रहिवासी श्री.ग्यानीराम सदाराम उके यांनी तक्रार दिली होती की,*आरोपी ईसम

1) गोकुल घागरू गहेलोद वय 45 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे





2) गुडडु गोकुल गहेलोद वय 28 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे दोघही राहणार पत्ता- वारंगागाव, बुटीबोरी, नागपुर



यांनी संगणमत करून फिर्यादी च्या घरी गुप्तधन आहे ते गुप्तधन मांत्रीकाच्या मदतीने काढून देतो असे सांगुन खोटा बनाव करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याचेकडून टप्प्याटप्प्याने नगदी 7 लाख रुपये घेतले व तक्रार दार यांची फसवणुक केली अश्या फिर्यादीच्या तक्रारी वरुन नमूद आरोपी यांचे विरूध्द पोलिस स्टेशन देवरी येथे अपराध क्रमांक 354/2023 कलम 420, 34 भा.दं.वी, सह कलम महा. नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.



पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांनी पोलिस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आणि गुन्ह्यातील आरोपीतांना तात्काळ अटक करून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीतांचा शोध घेत होते गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्यात येत असताना आरोपीतांचे राहत असलेल्या ठाव ठिकाणाबाबत माहिती घेण्यात येत होती. तांत्रीक विश्लेषनावरून गुन्ह्यातील नमुद दोन्ही आरोपी हे क्रांतीनगर जव्हार गाव, तालुका जव्हार, जिल्हा- पालघर येथे असल्याची माहीती मिळाल्याने. स्थागुशा पथकाने जिल्हा पालघर येथे जावून दोन्ही आरोपीतांना स्थानिक पोलीसांचे मदतीनें ताब्यात घेतले…

दोन्ही आरोपी यांना नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे कबूल केले. नमूद गुन्ह्यात तक्रारदार यांना फसवणुक केलेल्या 7 लाख रुपयाचे रकमेबाबत विचारणा केली असता  त्यांनी लोकांकडून व्याजाने पैसे घेतल्याने त्यांचेवर असलेले कर्ज भागविले असल्याचे सांगितले. दोन्हीं आरोपीतांना पोलिस ठाणे देवरी पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत..

सदरची कामगिरी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय शिंदे, पो.हवा. लुटे, चेतन पटले, रियाज शेख, पो.शि.संतोष केदार, अजय रहांगडाले, सायबर सेल चे पो.हवा.धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केलेली आहे





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!