स्थानिक गुन्हे शाखेने शहादा येथील घरफोडीचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा 24 तासांचे आत उघड करुन गुन्हयातील आरोपींकडून एकुण 1,51,500/- रु किमतीचा रोख रक्कम व सोन्याचांदीचा मुददेमाल केला हस्तगत…..

नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शहादा पोलिस ठाणे हद्दीतील कुंभार टेक मच्छी बाजार, शहादा येथे राहणाऱ्या फिर्यादी नजमा अब्दुल रहमान खाटीक यांनी पोलिस स्टेशन शहादा येथे तक्रार दिली की त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात इसमांनी प्रवेश करुन एकुण 1,90,000/-रु किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला यावरुन शहादा पोलिस ठाणे येथे गुरनं 254/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे दि. 18/04/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पोलिस अधिक्षक यांच्स आदेशाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असतांना दि 18/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा शहादा शहरातील मीरानगर भागात राहणा-या मोनु ऊर्फ समीर शहा याने त्याचे साथीदारांसह केला आहे, याबाबत खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलिस अधिक्षक  श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई करणेकामी सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून इसम  मोनु ऊर्फ समीर शहा याचा शहादा शहरातील मीरानगर परिसरात शोध सुरु असतांनाच तो मिळून आला.

सदर ईसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मोनु ऊर्फ समीर मेहमूद शहा, वय 24 वर्षे, रा. मीरा नगर, शहादा, जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार  1) शोएबखान शेरुखान पठाण, वय 30 वर्षे, रा. शहीद अब्दुल हमीद चौक, शहादा, जि. नंदुरबार 2) जुबेर ऊर्फ पप्पू हुसेन बेग, वय 21 वर्षे, रा. शहीद अब्दुल हमीद चौक, शहादा, जि. नंदुरबार अशांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली.त्यानुसार वर नमुद आरोपींकडुन एकुण 1,51,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 51,500/- रुपये रोख रक्कम तर 1,00,000/- रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये शहादा पोलिस ठाणे गुरनं. 254/2025 हा गुन्हा 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर ताब्यातील तिनही इसमांना शहादा पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलिस अधिक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार,नापोशि पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, मोहन ढमढेरे, पोशि/शोएब शेख, सतिश घुले यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!