माजी नगरसेवक कल्लु यांचेवर हल्ला करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवर गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी…..

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी चे ११.०० वा. दरम्यान सावलानी किराना दुकानाचे समोर हेमु कॉलोनी यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करुन  माजी नगरसेवक







लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल यादव वय ४२ वर्ष रा. यादव चौक गोंदिया



यास कोणत्यातरी बंदुकीने गोळी मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी

लक्की छगनलाल यादव वय २० वर्ष रा. बाराखोली सिंधी कॉलोनी गोंदिया

याचे तक्रारीवरुन वरून पोलिस स्टेशन गोंदिया शहर अप.क्र. ११/२०२४ कलम ३०७, ३४ भादवि. सह कलम ३,२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे गोळीबाराची घटना करून पसार झाले होते. पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे यांनी सदर गुन्हयाचे गांभिर्य ओळखुन उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन  गोंदिया शहर, चंद्रकांत सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. दिनेश लबडे, यांना सदर गोळीबार प्रकरणातील नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींचा तातडीने शोध घेवून आरोपींना जेरबंद करण्याचे निर्देश वजा सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया  प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा.  दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. ची ३ पथके तसेच पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन गोंदिया शहर,  चंद्रकांत सुर्यवंशी, यांची दोन पथके, अशी वेगवेगळी पथके अज्ञात आरोपींचे शोधाकरीता नेमण्यात येवून शोधाकरीता रवाना करण्यात आलेली होती.

सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवुन नेमलेल्या पथकाला वेगवेगळी जबाबदारी नेमून घटनास्थळावरील सी.सी. टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज ची बारकाईने निरीक्षण करून गोळीबार करणाऱ्या आरोपींचे फोटो प्राप्त करण्यात आले. तसेच आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल व आरोपींचे प्राप्त फोटो तसेच गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त माहीतीच्या आधारे गोळीबार करणारे आरोपी हे कळमना, नागपुर येथील असल्याचे समजले. यावरुन सदर आरोपींच्या शोधकामी नागपूरला पथके रवाना करण्यात आली. सपोनि विजय शिंदे व पोउपनि महेश विघ्ने यांचे दोन्ही पथकानी आरोपींचा कळमेश्वर, नागपुर येथे शोध घेवून

आरोपी

१) गणेश शिवकुमार शर्मा वय २१ वर्ष रा. भिंडी ले आउट वरोडा ता. कळमेश्वर जिल्हा नागपुर
२) अक्षय मधुकर मानकर वय २८ वर्ष रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी कळमेश्वर जिल्हा नागपुर

यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचरपुस, चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच

आरोपी क्रं. ३) धनराज ऊर्फ रिंकु व राजेंद्र राउत वय ३२ वर्ष रा. कुंभारेनगर गोंदिया

हा गंगाझरीच्या जंगलामध्ये असल्याची माहीती दिल्याने माहीतीनुसार आरोपी क्र. ३ यांस पथकाने गंगाझरी जंगलामध्ये सापळा लावुन ताब्यात घेण्यात आले. तसेच

आरोपी क्र. ४) नागसेन बोधी मंतो वय ४१ वर्षे रा. गौतम बुध्द वार्ड, श्रीनगर गोंदिया

यांस गोंदिया येथुन गोंदिया शहर पथकाद्वारे ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.यातील आरोपी क्र. १ ते ४ यांचेकडे स्वतंत्र रित्या चौकशी, विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्यांनी

फरार आरोपी ५)  प्रशांत मेश्राम, रा. भिमनगर गोंदिया व ६) रोहीत मेश्राम, रा. गोंदिया ह.मु. कळमेश्वर नागपूर

यांचे सांगणेनुसार त्यांनी कट रचल्याप्रमाणे लोकेश ऊर्फ कल्लु सुदंरलाल यादव यांस माऊझर (अग्निशस्त्र) च्या गावठी पिस्टल च्या साहाय्याने गोळी मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पळून गेल्याचे  सांगीतले आहे. आरोपींचे वैद्यकीय परीक्षण के.टी. एस. रुग्नालय गोंदिया येथुन करण्यात आले असुन पुढील कारवाई कामी गोंदीया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे मा. न्यायालयाने आरोपीतांचा दिनांक-22- 01-2024 पर्यंत 10 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे सदर गुन्हयासंबंधाने अधिकचा तपास सुरू आहे तसेच गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे तसेच तपासाच्या दृष्टीने ईतर अनेक बाबी पडताळणी करण्यात येत आहेत… मुख्य आरोपीचे अटकेनंतर तसेच गुन्ह्याचे तपासाअंती सदर प्रकरणाचा साविस्तर उलगडा होणार

सदरची धडाकेबाज  कामगीरी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी गोंदिया प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक,  चंद्रकांत सुर्यवंशी यांचे नेतृत्वात सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, सायकर, स्थागुशा सपोनि गराड, पोउपनि वानखेडे, पो.स्टे. गोंदिया शहर तसेच पोलीस अंमलदार स.फौ. अजुर्न कावळे, मधुकर कृपाण, कापगते, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, सुजित हलमारे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्रसिग तुरकर, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, विठ्ठल ठाकरे, प्रकाश गायधने, पोशि. संतोष केदार, हंसराज भांडारकर, अजय रांहागडाले, चापोशि. घनशाम कुंभलवार, मुरलीधर पांडे, चापोहवा. लक्ष्मन बंजार, स्था.गु.शा. गोंदिया तसेच सायबर सेलचे प्रभारी श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनात पोहवा- दिक्षीत दमाहे, धनंजय शेन्डे, प्रभाकर पलांदुरकर, संजय मारवाडे, रोशन येरने, यांनी तसेच गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे पोलिस पथक स.फौ. घनश्याम थेर, पोहवा-जगेश्वर उईके, भाटीया, टेंभरे, लोंदासे, चव्हान, रहांगडाले, सपाटे पोशि-बिसेन, रहांगडाले, सोनेवाने, रावते, बारेवार, मपोहवा-चव्हान यांनी अथक परीश्रम घेवून गुन्हयातील आरोपीतांना जेरबंद करण्याची कामगीरी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!