
गोमांस तस्करी करणारे वाहन सालेकसा पोलिसांनी घेतले ताब्यात…
सालेकसा(गोंदिया) ः सवीस्तर व्रुत्त असे कपोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे दिनांक 07/10/2023 रोजी सालेकसा येथील पोलिस पथकाने सालेकसा हद्दीत छापा टाकून कारवाई केली असता एक पांढऱ्या रंगाची इरटीगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 आमगांव कडुन दर्रेकसा च्या दिशेने येतांना दिसले. सदर वाहन पोलिस पथकाचे मदतीने थांबविण्यात आले असता त्यात दोन इसम दिसून आलेत.सदर दोन्ही ईसम व वाहनाची तपासनी केली असता वाहनाचे मागील बाजूचे शिटवर 15 मोठ्या पिशव्या ठेवल्या होत्या. सदर पिशव्यांची पंचासमक्ष पाहनी केली असता त्यामध्ये गोमांश असल्याचे दिसुन आले. सदर पिशव्यामधे अंदाजे प्रत्येकी 30 किलो ग्रॅम प्रमाणे एकुण 450 किलोग्रॅम किंमती प्रति किलो 150/- रु. प्रमाणे 67,500/- रु. गोमांस मिळुन आला. गोमांस बाबत विचारपुस केली असता त्यांनी डोंगरगढ येथे विक्री करिता इरटीगा चारचाकी वाहनात नेत असुन त्याबाबत त्यांचे कुठलेही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. सदर पिशव्यांमधे असलेला अंदाजे एकुण 450. किलो ग्रॅम प्रति किलो 150/- रु. प्रमाणे किंमती अंदाजे 67,500/- रु. चा गोमांस सदृश्य मांस व एक पांढऱ्या रंगाची इरटींगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 किंमती अंदाजे- 5,90,000/- रु. असा *एकुण 6,57,500/- रु.* चा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपीतां विरुध्द पो.स्टे. ला अप क्र. 367/2023 कलम 5, 5 (सी), 9, 9 (ए) महा. प्रा. रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आले असुन दोन्ही आरोपीतांना मा. न्यायालय आमगांव येथे पेश केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे तपास सपोनि अरविंद राऊत पो.स्टे. सालेकसा हे करित आहेत.
वरील कामगिरी पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अशोक बनकर अप्पर पोलिस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, संकेत देवळेकर, उप-विभागिय पोलिस अधिकारी देवरी, किशोर पर्वते, प्रभारी उप-विभागिय पोलिस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाबासाहेब बोरसे (ठाणेदार), पोउपनि अजय पाटील, पो.ना. रितेश अग्नीहोत्री, पोशि इंगळे , वेदक, कटरे, गोसावी, पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.




