हिंगोली पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव,५ आरोपी अटकेत…
हिंगोली – जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सर्व ठाणेदारांना सतर्कपणे पेट्रोलींग करण्याच्या नेहमी सुचना देतात त्या अनुशंगाने पोलिस स्टेशन बाळापुर हददीत पोस्टे बाळापुरचे पथक सतर्कपणे पेट्रोलींग करीत होते.
दिनांक ०३.१०.२०२३ रोजी मध्यरात्री मौ. बोथी ता. कळमनुरी या गावी अज्ञात पाच दरोडेखोरांनी सुधाकर यशवंतराव बर्गे वय ५४ वर्ष व्य. शेती रा. बोथी यांच्या म्हशीच्या आखाडयावर येऊन त्यांचे गळ्याला विळा लावुन त्यांचे मालकीच्या तीन म्हशी जबरीने पिकअप मध्ये भरून चोरून नेत होते. सदरची माहिती फिर्यादीने तात्काळ बाळापुरचे ठाणेदार सपोनि सुनिल गोपीनवार यांना दिली. त्या अनुषंगाने बाळापुरचे पेट्रोलींग पथक चोरटयांचा माघ काढत काढत जाउन दाती पाटी येथे ०३ चोरटयांना पिकअप सह पकडले.
बाळापुर परंतु उर्वरित दोन चोरटे पसार झाले होते सदर परीसराची तात्काळ नाकाबंदी करून तसेच तांत्रिक मदत घेउन पोलिस पथकांनी पहाटे पहाटे उर्वरित दोन चोरटयांना सुध्दा पकडले आहे. चोरटयांची नावे
१) वामन शामराव गरसुळे वय २३ रा. गउळ ता. कंधार जि. नांदेड
२) विलास बालाजी शामगिरे वय २० रा. ढगे पिंपळगाव ता.लोहा. जि.नांदेड राजु भरत सोळंके वय २० रा. कुरळा ता. कंधार जि. नांदेड ३) अमोल विश्वनाथ पळसकर रा. अंजनवाडी ता.पालम जि. परभणी व इतर दोन विधीसंघर्ष ग्रस्त बालक ) अशा
प्रकारे आरोपी असुन पाचही आरोपींतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीविरूध्द् भादवी ३९५ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउपनि बाळु चोपडे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील,उपविभागीय पोलिस अधीकारी वसमत, . संदिपान शेळके, पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे स्थागुशा हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन बाळापुरचे ठाणेदार सुनिल गोपीनवार, पोउपनि शिवजी बोंडले, पोउपनि
बाळु चोपडे, ग्रेडपोउपनि रामा सुब्रवाड, पोलिस अंमलदार शेषराव जोगदंड, रामदास ज्यादलवाड, काळोजी वानोळे, प्रविण चव्हाण, शिवाजी पवार, होमगार्ड गायकवाड व बोथी येथील गावकारी यांची मदत मिळाली. तसेच सायबर सेलचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार दत्ता नागरे यांनी तांत्रिक सहाय पुरविले.
पोलिस अधीक्षकांनी सर्व पोलिस पथकाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.