अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ८ गुन्हे उघड करुन १० मोटारसायकल केल्या जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन  १० मोटारसायकल केल्या जप्त….

जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपींता शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड यांना दिले होते





त्यावरुन बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोउपनिरी गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोहवा गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन यांचे पथक तयार करण्यात आले  नमुद पथकातील पोहवा विनोद पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, टाकरखेडा ता. जामनेर येथील १) विशोल गोपाल भोई, रा. टाकरखेडा ता. जामनेर हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता.



परंतु वर नमुद पथकातील अमंलदार यांनी सुरेश पाडवी हा त्याचे गावी टाकरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास टाकरखेडा येथून ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतल्याप्रमाणे अजुन त्याचे दोन साथीदार २) देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, ३) सुरज अशोक पारधी (सांळुखे), रा.टाकरखेडा ता. जामनेर जि. जळगाव यांना ताब्यात घेवून त्याचे कडून ४,३३,०००/- रु. किं.च्या १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत १) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ५८३/२०२४, २) एम.आय.डी.सी. पो.स्टे.ला गुरनं २५८/२०२४, ३) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ३३२/२०२४, ४) भुसावळ शहर पो.स्टे. CCTNS NO १५२/२०२४, ५) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ६३३/२०२४, ६) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ६५०/२०२४ भादवि कलम भा.न्या.सं.३०३ (२), ७) जळगाव शहर पो.स्टे. गुरनं ३८७/२०२४, ८) जिल्हापेठ पो.स्टे. गुरनं ३११/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत २ मोटार सायकल यांचा शोध सुरु आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेत्रुत्वात पोउपनिरी गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोहवा गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन यांनी केली

करण्यात आली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!