
फैजपुर पोलिसांची बंपर कार्यवाही ८३ लाखाच्या गुटख्यासह,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….
फैजपूर पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा,१ कोटी १७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..,
फैजपुर(जळगाव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपुर विभाग यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किसन नजन पाटील यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली दि. 10/01/2024 रोजी 03.30 वाजेचे सुमारास सहा. पोलिस निरीक्षक निलेश वाघ पोलिस स्टेशन फैजपुर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक मैनुद्दीन सय्यद, मोहन लोखंडे, पोहवा गोकुळ तायडे, विकास सोनवणे ,उमेश चौधरी तसेच रात्रगस्त चेकींग अंमलदार सफौ देविदास सुरदास आणि शासकीय वाहनावरील चालक सफौ अरुण नमायते असे सर्व आमोदा गावाचे पुढे हॉटेल कुंदन समोर रोडवर नाकांबदी करीत असतांना सावद्या कडून भुसावळ कडे जाणारे दोन आयशर ट्रक क्रमांक


MH-19/CY-9364

MH-19/CX-0282

अशासह एक टाटा हॅरीयर कंपनीचे वाहन क्रमांक
MH-09/FJ-6171
अशी वाहने थांबवुन त्यांची तपासणी केली असता दोन्ही आयशर वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल गुटखा 83,06,800/- रुपये किंमतीचा तसेच 34,00,000/- रुपये किंमतीचे दोन आयशर मालवाहू ट्रक व टाटा हॅरीयर कंपनीची चारचाकी वाहन असा एकुण 1,17,06,800 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. मिळुन आलेल्या मुद्देमाल व त्यासोबत मिळुन आलेल्या इसम
1) ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी वय 33 वर्षे रा. कोडगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव ह.मु. शास्त्रीनगर, चाळीसगाव
2) जयेश सुभाष चांदेलकर वय 33 वर्षे रा. प्लॉट नं. 21, रामेश्वर कॉलनी, जळगाव जि. जळगाव
3) राकेश अशोक सोनार वय 29 वर्षे रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव जि. जळगाव
4) मंगेश सुनिल पाटील वय 31 वर्षे रा. प्लॉट नं. 28, रामनगर, MIDC जळगाव जि. जळगाव
यांचे विरुध्द पोहवा विकास सुरेश सोनवणे फैजपूर पोलिस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन तक्रार दिल्याने फैजपूर पोलिस स्टेशनला गु. रजि. नं. 05/2024 भादवि कलम 328, 188, 272 273,34 प्रमाणे गुह्या दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपूर विभाग श्रीमती अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक निलेश वा पोलिस स्टेशन फैजपुर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते,सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ व पोलिस स्टेशन फैजपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली


