
जालना येथील पैशाची बॅग हिसकणारा आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
नवीन मोंढा रोडवरील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, त्याच्याकडुन रोख रक्कम 80,000/- ₹ केले जप्त…
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्यानुषंगाने दिनांक 07/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार हे नवीन मोंढा रोडवरील वरकड हॉस्पीटल जवळील पैशांची बँग बळजबरीने हिसकावुन नेल्या
प्रकरणातील चंदनझिरा पोलिस ठाणे येथील दाखल गुरनं 504/2023 कलम 392,34 भादंवि मधील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा विठ्ठल भिमराव अंभोरे रा. सुंदरनगर, चंदनझिरा जालना याने त्याचे ईतर साथीदार याचे सह केला असुन तो बोरगाव (देवी) ता. भोकरदन येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक बोरगाव (देवी) येथे पाठवुन विठ्ठल भिमराव अंभोरे रा. सुंदरनगर, चंदनझिरा जालना यास ताब्यात घेण्यात येऊन त्याने गुन्हा केल्याचे कबुली देऊन त्याचे कडुन त्याचे वाटनीला
आलेल्या रक्कमेपैकी 80,000/- रोख जप्त करण्यात आले असुन नमुद आरोपीस पुढील तपासकामी चंदनझिरा पोलिस ठाणे जालना यांच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याने यापुर्वी ही बँग चोरीचे गुन्हे केलेले आहे.
सदरची कारवाई.पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे,विजय डिक्कर, दत्ता वाघुंडे, सागर बाविस्कर, चंद्रकला शडमल्लु, सचिन आर्य, सतिश श्रीवास,योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, रेणुका बांडे, रमेश पैठणे सर्व स्थागुशा यांनी केली आहे.




