
धारदार तलवारी बाळगणारा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अवैधरित्या तीन धारधार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करनेबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई
करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/01/2024 रोजी पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली होती की, ईसम नामे राहुल कैलास जाधव वय 21 वर्षे, रा. भारतमाता मंदीर, नळगल्ली जालना हा त्याचे राहते घरी स्वत:चे ताब्यात अवैध रित्या 03 धारधार
तलवार बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ईसमांचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी भारतमाता मंदीर, नळगल्ली येथे मिळुन आल्याने त्याचे राहत्या घरातुन अवैध 03 धारधार तलवारी
मिळुन आल्या आहेत. नमुद आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा.
पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलिस अंमलदार विनायक कोकणे, रामप्रसाद रंगे, दिपक घुगे, लक्ष्मीकांत आडेप, प्रशांत लोखंडे, संभाजी तनपुरे, सचिन आर्य, देविदास भोजणे, सतीश श्रीवास, आक्रूर धांडगे, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, भागवत खरात सर्व स्था. गु. शा. जालना यांनी केली आहे.




