मंदिरात चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.४ गुन्हे केले उघड…
जालना जिल्ह्यात मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, सोन्याची मणी व नथ असा एकुण 94150/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यातील आष्टी, तिर्थपुरी, गोंदी, अंबड भागात मंदिरामधे चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, याना सुचना दिल्या होत्या, त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक पथक स्थापन करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मंदिरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत बारकाईने सुचना व मार्गदर्शन केले होते,
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे मंदिर चोरीचे घडलेल्या ठिकाणांचे तांत्रीक विश्लेषण व गुप्तबातमीदाराच्या माहितीच्या आधारे समजले की, पोलिस ठाणे आष्टी, तिर्थपुरी व गोंदी हद्दीतील येथे झालेल्या मंदिरातील चोऱ्या ह्या गोविंद तानाजी चव्हाण रा. बरकत नगर, गंगाखेड जि. परभणी याने त्याचे साधीदारासह केल्या आहेत.मिळालेल्या माहिती प्रमाणे नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो गंगाखेड जिल्हा परभणी येथे मिळुन आला. त्यास ताब्यात व विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत व त्याचे इतर साथीदारा बाबत माहीती विचारली असता. त्याने सदरचे गुन्हे त्याचा साथीदार सुनिल वामन पवार रा. किनगाव ता. अहमदपुर जि. लातुर व शेख अजिम शेख अकबर रा. गंगाखेड जि.परभणी यांच्यासह मिळुन जालना जिल्हयातील आष्टी, गोंदी, तिर्थपुरी भागात विळे विकण्याच्या बहाण्याने मंदिरात प्रवेश करुन, मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने व दानपेट्या मधील पैसे चोरल्याची कबुली दिली आहे.
त्यावरुन आरोपी सुनिल वामन पवार यास किनगाव ता.अहमदपुर जि. लातूर येथुन ताब्यांत घेतले असुन आणखी एक आरोपीचा शोध सुरु आहे.नमुद आरोपीच्या ताब्यातुन मंदिरामधील सोन्या चांदीचे दागिण्यासह गुन्हयात वापरलेले मोटार सायकल सह एकूण 94150/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे कडुन एकुण 04 गुन्हे उघडकीस आणले आहे नमुद दोन्ही आरोपींना जप्त मुददेमालासह पुढील तपासकामी पोलिस ठाणे तिर्थपुरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजने, प्रशांत लोखंडे, कैलास चेके, भागवत खरात, धिरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.