
कोतवाल परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर करुन पेपर फोडणार्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
जालना ः सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 07.10.2023 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब, जालना यांचेकडुन जिल्हयातील तहसिल कार्यालयातील कोतवाल पदाची परिक्षा नियोजित करण्यात आलेली होती. सदर परिक्षा हि जालना शहरातील तीन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार होती. पैकी शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी या महाविद्यालयामध्ये परिक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने परिक्षा केंद्रावर योग्य त्या कायदेशीर बाबींची पुर्तता करुन योग्य पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर
परिक्षेचा पेपर दुपारी 15.00 ते 16.30 वा. दरम्यान असा ठेवण्यात आला होता. सदर परिक्षेमध्ये काही परिक्षार्थी उमेदवार हे परिक्षा दरम्यान मोबाईल व इतर डिव्हाईस अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन गैरप्रकार करणार असल्याची गोपनिय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना माहीती मिळालेली होती. सदर माहीतीचे आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांना तसेच परिक्षा केंद्र प्रमुख यांना सदर बाब लक्षात आणुन देवुन संशयीतांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सापळा लावण्यात आला होता. राष्ट्रमाता इंदिरा गांधी या परिक्षा केंद्रांवर पेपर चालु असतांना केंद्राबाहेर काही संशयीत मुले ही संशयीतरित्या थांबलेली असतांना मिळुन आल्याने पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेवुन विश्वासात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यामध्ये मोबाईल डिव्हाईस अशा संशयीत वस्तु मिळुन आल्या. त्यांना अधिक विचारपुस
केली असता त्यांनी सांगीतले की परिक्षा केंद्रामधील आमचे सोबतचे परिक्षार्थीनी डिव्हाईसद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो काढुन
आम्हास पाटविलेले असुन मोबाईल डिव्हाईसद्वारे आम्ही त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत आहोत. सदर बाब परिक्षा केंद्र प्रमुख
यांचे निदर्शनास आणुन देवुन त्यांचे मदतीने परिक्षा केंद्रामधील गैरप्रकार करणारे परिक्षार्थी व त्यांना प्रश्नांची उत्तरे पुरविणारे असे एकुण पाच मुले ज्यात परिक्षार्थी )
१) ईश्वर परमेश्वर कवडे वय 26 वर्षे रा. पिरवाडी ता. बदनापुर जि. जालना
2) गजानन रतन जगरवाल वय 26 वर्षे रा. खडकवाडी ता. बदनापुर जि.जालना


3) राजेंद्र महासिंग सुंदर्डे वय 26 वर्षे रा. राजेवाडी ता. बदनापुर जि. जालना

4) अनिल देवचंद सुलाने वय 22 वर्षे रा.डावरगाव ता. बदनापुर जि. जालना

व प्रश्नांची
उत्तरे पुरविणारा
5) आकाश इंदलसिंग बहुरे वय 22 वर्षे रा. पिरवाडी ता. बदनापुर जि. जालना यांना ताब्यात घेवून त्यांचे
ताव्यातुन डिव्हाईस, मोबाईल एअरफोन, वेगवेगळे सिमकार्ड असे साहीत्य जप्त करण्यात आले. तसेच त्यांचे इतर दोन
साथीदार
6 ) किशोर परमेश्वर कवडे वय 23 वर्षे
7) युवराज इंदलसिंग बहुरे वय 21 वर्षे दोन्ही रा. पिरवाडी
ता. बदनापुर जि.जालना
यांना देखील बारीबारीने ताब्यात घेवून सर्वांचे ताब्यातुन वाहनासह 9,11,000/ रुपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरार असुन त्याचा शोध सुरु आहे. निष्पन्न सर्व आरोपीतांचे विरुद्ध अव्वल कारकुन योगेश बाळकृष्ण वानखेडे तहसिल कार्यालय अंबड यांचे फिर्यादवरून पोलिस ठाणे कदीम जालना येथे भादवि कलम ४१९, ४२०,४७१,१२०ब, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कदीम जालना पोलिस करीत आहेत.
सदरची कार्यवाही प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, परिविक्षाधिन पोलिस उप अधीक्षक चैतन्य कदम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, कैलास चेके, योगेश सहाने, रवि जाधव, सौरभ मुळे यांनी कार्यवाही पार पाडली आहे.


