
स्मशानभुमीत आढळला भोंदुगिरीचा प्रकार १५ लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात….
कुरुंदवाड(कोल्हापुर) – कृष्णा नदी काठाला नैसर्गिक खडकाचा घाट आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत
पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिक वेशातील एका मंत्रिकासह सांगली जिल्यातील तब्बल 13 ते 15 जणांनी एक यज्ञ पेटवला. तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा झाल्यानंतर इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी निघाली. हनुमान मंदिराजवळ सांगली पासिंग असलेली दुचाकी तसेच एक रिक्षा लावली होती. तिथे
आल्यानंतर गावातील युवकांनी त्यांना हे काय केला? अशी विचारणा केल्यानंतर पूजा केल्याचे सागितले. अधिक चौकशी केली असता भोंदूगिरीचास प्रकार उघडकीस आला. तरुणांनी बॅगा पाहिल्या असता त्यामधे लिंबू, कुंकू, हळद, दोरा गंडे, नारळ आदी साहित्य सापडले. भोंदूगिरी कृती असल्याचे लक्षात आल्यानंतर
मांत्रिकासह अन्य काहीजणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. काहींनी पलायन केले. मात्र, हा यज्ञ कशासाठी करण्यात आला? यामागे काही कारण आहे का? कोणाला फसवण्याचा उद्देश
तर नाही ना? अशीही शंका उपस्थित झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच गणेशवाडीपासून 10 किमी अंतर असलेल्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये भोंदू बाबाच्या नादी लागून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात
मांत्रिकानेच कोट्यवधी रुपयांना फसवून त्यांना विष दिले होते. त्यामुळे हे प्रकरण ताजे असताना सांगलीमधील एका मांत्रिकासह 14 जणांची टोळी गणेशवाडी कृष्णा नदी घाटावर आल्याने व केलेल्या या भोंदूगिरीने भूवया उंचावल्या आहेत. म्हैसाळ येथील शिक्षक पोपट वनमोरे, त्यांचा भाऊ पशुवैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे या दोघा भावांसह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांना जून महिन्यात विषारी औषध देऊन त्यांची सामूहिक हत्या करण्यात आली होती. गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास यास मोठी रक्कम दिली होती. मात्र, गुप्तधन मिळाले नसल्याने यासाठी घेतलेली रक्कम परत देण्यासाठी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास याला तगादा लावला होता. यामुळे अब्बासने वनमोरे कुटुंबीयांना काळ्या चहातून विषारी गोळ्या देऊन नऊ जणांची हत्या केली होती.


