औसा येथील निर्घुन खुन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

औसा(लातुर) –याबाबत सवीस्तर माहिती अशी की, पोलिस ठाणे औसा हद्दीत बुधोडा ते औसा जाणारे रोड लगत दिनांक 7 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी इस्माईल मुबारक मनियार, वय 41 वर्ष, राहणार हरंगुळ बुद्रुक, लातूर यांचा अज्ञात कारणासाठी निघृण खून केल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 423/ 2023 कलम 302, भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुनाचा उलघडा व खुनातील आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (औसा) रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथके तयार करून खुनाच्या कारणांचा व अज्ञात मारेकरीचा विविध मार्गाने शोध घेऊन तपास करण्यात येत होता.  सदर पथकाने संशयाच्या भवऱ्यात येणाऱ्या अनेक संशयित व्यक्तीकडे सखोल विचारपूस करून त्यांचे जाब-जबाब नोंदविण्यात येत होते. तसेच खुनातील मयताचे नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक संबंध असलेल्या अनेक लोकांकडे विचारपूस करण्यात येत होती. सदर पथकांनी कठोर परिश्रम घेऊन व विविध मार्गाने चौकशी करून मिळालेल्या तांत्रिक माहितीचे बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून सदर खुनाच्या गुन्हयातील आरोपी अशपाक शेख व जाकीर शेख दोघे राहणार लातूर हेच असुन त्यांनीच सदरचा खून केल्याचे निष्पन्न केले. इस्माईल मनियार यांचा खून केल्यानंतर आरोपी हे काही घडलेच नाही असा बनाव करून दोन दिवसापासून वावरत होते. दरम्यान बातमीदाराकडून मिळाले मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक माहिती चे विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील नामे

1) अशपाक युसुफ शेख,वय 28 वर्ष, राहणार हमाल गल्ली,लातूर.





2) जाकीर अब्दुल गफार शेख ,वय 30 वर्षे, राहणार खाडगाव रोड, लातूर



यांना दिनांक 09/10/2023 रोजी पोलीस ठाणे औसा च्या पथकाने अतिशय सीताफिने लातूर येथून त्यांच्या राहते घरातून ताब्यात घेऊन पोलीस ठाणे औसा येथे आणण्यात आले. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी इस्माईल मनियार याला मारहाण करून खून केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीस ठाणे औसा येथे दाखल असलेल्या गुन्हायात गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.गुन्ह्याचा, खुनाच्या कारणांचा व इतर बाबींचा पुढील तपास औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भोळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, सहाय्यक फौजदार संजू भोसले,पोलिस अमलदार सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव ,राजेश कंचे ,योगेश गायकवाड , रियाज सौदागर, नकुल पाटील, सायबर सेल चे पोलिस निरीक्षक अशोक बेले, पोलिस अंमलदार गणेश साठे, शैलेश सुडे, रामकिशन गुट्टे , मुबाज सय्यद, शिरमवाड प्रल्हाद, महारुद्र डिगे, शिवरुद्र वाडकर ,मोतीराम घुले, तुकाराम माने, बालाजी चव्हाण, भरत भुरे, गोविन्द पाटील, नवनाथ चामे, मदार बोपले, सचिन मंदाडे, भागवत गोमारे, दंतुरे, पांचाळ यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!