प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपुर – जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखली यांनी पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे एका पांढऱ्या रंगाची स्कॉरपीओ गाडी क्रमांक एम. एच. 33 ए.सी. 1101 मध्ये काही संशईत ईसम हे अंमली पदार्थ आणुन ते विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत. अशा माहीती वरून पोनि स्था. गु. शा. चंद्रपुर याचे आदेशा वरून विशेष पथकाचे पो.उप नि. अतुल कावळे व सोबत पो.स्टाफ असे यांनी कायद्याचे पालन करून छापा कार्यवाही करीता रवाना होउन संशयीत वाहनाचा बल्लारशा बायपास रोडने शोध घेत असताना नमुद संशयीत वाहन हे बजाज विद्या निकेतन शाळेच्या समोर उभे असल्याचे दिसुन आले. यावरून आम्ही तेथे जाउन वाहन चालक व त्याचे साथीदारास नाव गाव व पत्ता विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले . यावरून संशय येउन पंचासह वाहानाची तपासनी केली असता एका निळ्या प्लॅस्टीक पन्नी मध्ये अंदाजे 5.213 ग्रॅम किंमत अंदाजे 52,130/- रू. चा गांजा अंमली पदार्थ मिळुन आला त्या नंतर वाहन चालकास व त्याचे साथीदारास विश्वासात घेउन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे पुढील प्रमाणे सांगीतले
1 ) यश राज दुर्योधन, वय 18 वर्ष, रा. बजाज शोरुम मागे टिचर कॉलनी गडचिरोली
2) नेहाल इकरार ठाकुर वय 21 वर्ष, रा. गोकुळ नगर गरुवदारा जवळ गडचिरोली 3 ) सगिर खान ननुआ खान, वय 32 वर्ष, ह.रा. गोकुळ नगर गुरुद्वाराजवळ, गडचिरोली मुळे राह. निकोनी साहायपुर, गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश असे सांगीतले यावरून नमुद
आरोपी सोबत अंदाजे 5.213 ग्रॅम किंमत अंदाजे 52,130 /- रू. चा गांजा अंमली पदार्थ व सदर गुन्हया मधे वापरलेले वहान किमंत अंदाजे 15,000,00/- रू. आरोपीचे तिन मोबाईल किमंत अंदाजे 97,000/- रू असा एकुण 16,49,130/- रू चा मुददेमाल ताब्यात घेउन पो.स्टे. रामनगर येथे अप क.. 962/23 कलम 8 (क). 20 (ब) (ii)(ब),41.43 एन.डी.पी.एस.. 34 भादवी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन.डी.पी.एस.) 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. रामनगर हे करीत आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती रीना जनबंधू,उपविभागिय पोलिस अधिकारी चंद्रपुर सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा पो.उप नि. अतुल कावळे पो.हवा. शकील शेख, नापोशिपाई अनुप डांगे, मिलींद चव्हाण
नितेश महात्मे ,जमीन पठाण, पोशिपाई प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, चालक पोशिपाई रूषभ बारसिंगे यांच्या पथकाने
केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!