
सॉफ्टवेअर इंजिनिअरची ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पावणे सहा लाखांची फसवणूक…
सॉफ्टवेअर इंजिनिअरची ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पावणे सहा लाखांची फसवणूक…
धाराशिव (प्रतिक भोसले) – उमरगा तालुक्यातील एकोंडी जहागीर येथील अजयकुमार मोतीराम चव्हाण (वय २६ वर्षे) या सॉफ्टवेअर इंजिनिअरची अज्ञाताने व्हॉट्स ॲप ग्रूप मध्ये ॲड करून ऑनलाईन ट्रेडिंगचे अधिक नफ्याचे आमिष दाखवून 50,8000/- रु. आर्थिक ऑनलाईन फसवणुक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी अजयकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात (दि.12 फेब्रुवारी) रोजी भा.दं.सं.कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अज्ञाताने टेलिग्राम लिंक पाठवून त्याला ट्रेडिंग चे अकाऊंट लिंक आहे असे सांगून युजर नेम व पासवर्ड क्रिएट करायला सांगितले, त्याप्रमाणे फिर्यादी चव्हाण यांनी युजर नेम व पासवर्ड क्रिएट केला त्या नंतर त्याच दिवशी सकाळी 10.30 वा.सू. त्यांनी परत एका युपीआय आयडीवर ट्रेडिंगसाठी 2000 /- रु. जमा करण्यास सांगितले त्या साठी फोन पे, युपीआय आयडी फिर्यादी चव्हाण यांच्या मोबाईल नंबर यावर पाठविली व बँक डिटेल्स मागितली, फिर्यादीने बँक डिटेल्सची सर्व माहिती अज्ञात व्यक्तीला दिली. त्यानंतर लगेच त्या अनोळखी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे इक्वीटास फायनन्स स्मॉल बँकेच्या खात्यावर 2800/- रु. पाठविले. त्या नंतर वेगवेगळ्या लिंक पाठवुन त्यावर 60, 120 आणि 240 रु. बँक खात्यावर पाठविले. त्याच दिवशी दुपारी 3.30 वा.सु. 5000 रु. ट्रेडिंगसाठी पाठविण्यास सांगितले तेव्हा फिर्यादीने लगेच त्यांच्या युपीआय आयडीवर पैसै पाठविले. मग परत त्यांनी फिर्यादीच्या खात्यावर 6800/- रु. पाठविले

त्या नंतर (दि. 30 जानेवारी) रोजी सकाळी दहा वा.सू. फिर्यादीला दिलेल्या युपीआय आयडीवर 15000/- रु. पाठवण्यास सांगितले फिर्यादीने ते पाठविले. मग परत 4 जणांचा टेलिग्रामचा ग्रुप काढून फिर्यादी चव्हाण यांना त्यामध्ये ॲड केले. त्यावर चव्हाण यांना ग्रुपमध्ये तीन स्टेप्स आहेत असे सांगितले. तसेच ग्रुपमधील करण वैष्णव या नावाच्या व्यक्तीने एका टेलिग्रामवर पैसे सेंड करण्यास सांगितले. त्या मध्ये पहिली स्टेप बँक 38000/- रुपये भरण्यास सांगितले तेव्हा ते फिर्यादीने भरले त्या नंतर दुसरी स्टेप म्हणून 150000/- रुपये भरण्यास सांगितले ते पण चव्हाण यांनी भरले, त्या नंतर दुपारी तिसरी स्टेप म्हणून 298000/- रु. भरण्यास सांगितले ते पण फिर्यादी चव्हाण यांनी भरले त्या नंतर परत त्याच दिवशी दुपारी पावणे दोन वा.सू. 150000/- रु. परत भरण्यास सांगितले ते पण चव्हाण यांनी भरले त्यानंतर फिर्यादी चव्हाण यांना व्हॉट्स ॲप ग्रुपमधुन बाहेर काढून टाकुन ग्रुप बंद केला. अशा प्रकारे ट्रेडिंगमध्ये अमिष दाखवुन जवळपास एकूण 508000/- रु. ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली अशी फिर्याद अजयकुमार चव्हाण यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिली. त्या नुसार दिलेल्या फिर्यादीवरून 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.



